रस्त्याच्या दुतर्फा असलेली जीर्ण झालेली झाडे तोडावी.- आजरा मनसेचे तहसीलदारांना निवेदन.
आजरा. प्रतिनिधी.२३.
आजरा तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा असणारी जीर्ण झालेली झाडे तोडावी व संभाव्य धोका टाळावा आशा अशयाचे निवेदन आजरा मनसे यांनी आजरा तहसिलदार विकास अहिर यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे. भादवणवाडी ते घाटकरवाडी पंर्यत रस्त्याच्या दुतर्फा असणारी जीर्ण झाडे तोडावी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग सदर रस्ता आमच्या विभागाकडे येत नसल्याचे सांगत असल्याने तो नॅशनल हायवे त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. यासाठी आपण संबंधित अधिकारी यांना कळवून जीर्ण झालेली झाडे तोडण्यास सूचना द्याव्यात चालू वर्षात पावसाने दमदार सुरुवात केली असून मागील काही घटना अपघात पाहता अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी येणाऱ्या पंधरा दिवसात जीर्ण झालेली झाडे नाही तोडल्यास संपर्क अध्यक्ष जयराज लाडगे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे या निवेदनावर तालुकाध्यक्ष अनिल निऊगरे, उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, प्रकाश कांबळे, शहराध्यक्ष कुणाल पोतदार, महिला आघाडी ता. अध्यक्ष सरीता सावंत, तसेच पुनम भादवणकर, अर्चना वंजारी, कोळीद्रे जि.प.अध्यक्ष चंद्रकांत साबरेकर, शाखाध्यक्ष वसंत घाटगे, मनसैनिक आदिच्या सह्या आहेत.
