Homeकोंकण - ठाणेध….झाले..मा.🛑प्रशासनाच्या नजरचुकीने झालेला आदेश दुरुस्त करावा.- मौजे हरपवडे गायरान १० एकर ऐवजी...

ध….झाले..मा.🛑प्रशासनाच्या नजरचुकीने झालेला आदेश दुरुस्त करावा.- मौजे हरपवडे गायरान १० एकर ऐवजी १७.५ एकरचा( मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी १० एकरचा ठराव.)🛑तहसीलदार आजरा येथील भुमि अभिलेख विरोधातील आंदोलन स्थगित. / रविवारी सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन.- ठाकरे – राणे वादानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा / राजकोट किल्ल्यावर मविआ अन् भाजपमध्ये राडा.- आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन

💥ध….झाले..मा.
🛑प्रशासनाच्या नजरचुकीने झालेला आदेश दुरुस्त करावा.- गायरान १० एकर ऐवजी १७.५ एकरचा
( मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी १० एकरचा ठराव.)
🛑तहसीलदार आजरा येथील भुमि अभिलेख विरोधातील आंदोलन स्थगित. / रविवारी सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन.- ठाकरे – राणे वादानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा / राजकोट किल्ल्यावर मविआ अन् भाजपमध्ये राडा.- आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन

आजरा.- प्रतिनिधी.

मौजे हरपवडे येथील गायरान मधील १० एकर जागा ग्रामपंचायतने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी दिली असता वाढीव १७.५ एकरचा आदेश काढण्यात आला आहे. प्रशासनाच्या नजरचुकीने झालेला आदेश दुरुस्त करुन मिळावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल. हरपवडे ग्रामस्थांचे निवेदन मौजे हरपवडे ग्रामपंचायतने सन २०२२-२३ मध्ये हरपवडे गायरान मधील १० एकर जागा गट नं.२२७ पुर्ण व गट नं.२२२ मधील रिकामी जागा गावसभा ठराव करुन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेकामी महावितरणला भाडेपट्याने देण्यात यावी असे ठरले व महावितरणने जागेसंदर्भात पुर्वपरवानगी घ्यावी असे ठरले. ग्रामपंचायत हरपवडे यांनी सन २०१९-२० ला सामाजिक वनीकरणामार्फत गट नंबर २२२ व २२४ मध्ये वृक्ष लागवड केलेली आहे त्यामध्ये आंबा, फणस, काजू, चिंच, पेरू, करंजी, सागवान इत्यादी देशी वृक्षाची साडेआठ हजार झाडे लावलेली आहेत. गायरान मधील ही निसर्गसंपदा वाचवावी.
१)मा.जिल्हाधिकारीसो यानी दिलेला आदेश दुरुस्त करुन द्यावा.
२) मुख्यमंत्री कृषी सौर वाहीनीसाठी ग्रामपंचायतने १० एकरचा ठराव दिलेला आहे.तेवढीच रिकामी जागा देणेत यावी.
४) सामाजिक वनीकरणामार्फत वृक्षलागवड केली आहे.१० एकरपेक्षा जादा जमिन दिल्यास, तेथील ८५००/- वृक्ष काढुन टाकावी लागतील. त्यामुळे गावचे व पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे.


५) उपविभाग भुमिअभिलेख, आजारा यानी मोजणी केली, पण हद्द निश्चित केली नाही. याची चौकशी करावी.
६) ग्रामपंचायतला व महावितरणला चुकीचा आदेश दुरुस्त होईपर्यंत आपण काम थांबवण्यांच्या इतर कोणतीही प्रकीया न करण्याच्या सुचना आपल्या स्तरावर देण्यात याव्यात. वरिल मुद्दाचा आपण चौहोबाजुनी विचार करुन योग्य तो निर्णय द्यावा.अन्यथा आदोलन केले जाईल.
सोबत:- १) ग्रामपंचायतचा ग्रामसभा ठराव प्रत
निवेदनाच्या प्रती तहसिल,भुमिअभिलेख,महावितरण,गटविकास अधिकारी,वनविभाग,सामाजिक वनिकरण आजरा व प्रांताधिकारी,जिल्हाधिकारीसोा याना देण्यात आल्या आहेत. मौजे हरपवडे येथील सरपंच श्री.सागर पाटील,ग्रा.प.सदस्या सौ.रेश्माताई मुल्लाणी, सौ.पुनम पवार, सौ.संगिता जाधव व माजी सरपंच सौ. वैशाली गुरव, तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग धांटोबे, धनाजी सावंत, आदिल मुल्ला, देवदास गुरव यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत
.

🛑तहसीलदार आजरा येथील भुमि अभिलेख विरोधातील आंदोलन स्थगित

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तहसील कार्यालयावर भूमीअभिलेख कार्यालय विरोधात मौजे किटवडे येथील गट नंबर १८१ मध्ये झालेली दोन तीन वेळा मोजणी मन मानी पध्दतीने केलेल्या अधिकार्यांच्या विरोधात गेली नऊ दिवस तहसील कार्यालय आजरा येथे आंदोलन पावसाळी वातावरणात सुरू होते. यासंदर्भात भूमि अभिलेख कार्यालय उप अधीक्षक विध्या तांगडे यांनी दिनांक २३/७/२०२४ चा काढलेला आदेश स्थगित केल्याचे व फेर मोजणी गडहिंग्लज कार्यालय मार्फत नोव्हेंबर मध्ये करून देण्याचे लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन स्थगित करणेत आले यावेळी नायब तहसीलदार माळसाकांत देसाई काॅ. शिवाजी गुरव काॅ. संजय घाटगे काॅ.काशिनाथ मोरे जयवंत पाटील यशवंत पाटील शिवाजी पाटील श्रीधर पाटील सुधाकर प्रभू विजया पाटील वनिता पाटील पुष्पा पाटील राजेश सावंत इत्यादी उपस्थित होते.

🟥रविवारी सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन.- ठाकरे – राणे वादानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई :- प्रतिनिधी

आज राजकोट किल्ला परिसरात मोठा राडा झाला. येथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि माजी मंत्री नारायण राणेंचे कार्यकर्ते भिडले. त्यामुळे दगडफेक आणि धक्काबुक्कीच्या घटना घडल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रस्ता मालवणमध्येच अडवण्यात आला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. मोदी शहांच्या दलालांनी मालवणमध्ये आमचा रस्ता अडवला. महायुतीच्या सरकारमध्ये मोठे घोटाळे होत आहेत. स्मारकाच्या कामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना याआधी कधीच घडली नाही. आता पुतळ्यासाठी पुन्हा टेंडर काढणार त्यातही घोटाळा करणार अशा कठोर शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली.
🟥येत्या रविवारी महाविकास आघाडी मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. ठाकरे आणि नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यातील वादानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. शिवरायांचा पुतळा कोसळण्यासारखी घटना याआधी कधीच घडली नाही. मोर्चात मोदी शहांचे दलाल रस्ता अडवून बसले होते.
स्मारकाच्या कामात कोट्यावधींचा घोटाळा झाला आहे. आता पुतळा उभारण्याचं टेंडर काढून पुन्हा घोटाळा करणार आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केलं ते देखील संतापजनकच आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आता या सगळ्या प्रकारच्या निषेधार्थ येत्या 1 सप्टेंबरला मुंबईत महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हुतात्मा स्मारक ते इंडिया गेट असा हा मोर्चा राहिल. या मोर्चात तिन्ही पक्षांतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

🟥राजकोट किल्ल्यावर मविआ अन् भाजपमध्ये राडा.- आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन

सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले. त्याठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात राडा झाला.

🟥यावेळी शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर धरणा देत असताना उद्धव ठाकरे यांनी फोन करुन त्यांना हिंमत दिली. मुख्य प्रवेशद्वारावर नारायण राणे आणि त्यांचे समर्थक थांबून आहे. त्याच ठिकाणावरुन किल्ल्यावर जाण्याची मागणी महाविकास आघाडीचे नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राजकोट किल्ल्यावर तणाव निर्माण झाला.

🔴आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे काय म्हणाले

राजकोट किल्ल्यावर आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. काय चाललेले आहे, कसे चालले आहे. त्याची विचारणा केली. त्याठिकाणी किती भ्रष्टाचार झाला ते पाहून या. म्हणजे भाजपचा भ्रष्टाचार देशभरासमोर मांडता येईल. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही घाबरणार नाही, अशी हिंमत देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोन केला, असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढवली आहे.

🟥आदित्य ठाकरे आंदोलनावर ठाम

नारायण राणे समर्थकांनी किल्ल्याचा मुख्य दरवाजा दीड तासापासून अडवून धरला होता. त्यानंतर त्यांनी हा दरवाजा मोकळा करण्यास सुरुवात केली. भाजप आणि मविआमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी जयंत पाटील किल्ल्यावर दाखल झाले. त्यांनी नितेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी वैभव नाईक आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. दुसरीकडे आदित्य ठाकरे आंदोलनावर ठाम होते. जोपर्यंत भाजप कार्यकर्ते किल्ल्यातून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरु राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राणे आणि त्यांचे समर्थक निघून गेल्यावर आम्ही त्याठिकाणी जाऊ, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

🔴दोन्ही बाजूने आपण वेळ घेतली असल्याचा दावा केला जात आहे.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.