शिकारीच्या उद्देशाने फिरत असणाऱ्या चार / आरोपी पैकी दोन संशयित आरोपी ताब्यात. दोघांचे पलायन.- आजरा वनविभागाची कारवाई.
आजरा.- प्रतिनिधी.

शिकारीच्या उद्देशाने फिरत असणाऱ्या दोन मोटरसायकल वरून चार आरोपी पैकी दोन संशयित आरोपी ताब्यात. तर दोन आरोपींनी पलायन केले.
दि. २३/०८/२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनूसार परिक्षेत्र वनअधिकारी आजरा
यांचे सुचनेनूसार वनपाल गडहिंग्लज, वनरक्षक गडहिंग्लज, वनरक्षक मलिग्रे, वनरक्षक साळगांव वनमजूर यांनी मौ. बेलेवाडी हु. येथील भावेश्वरीकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावला असता शिकारीच्या
उद्देशाने फिरत असणाऱ्या दोन दुचाकीवरून ४ आरोपी फिरत असलेचे दिसुन आले. सदर आरोर्पीना तपासणीकरीता थांबविले असता वनविभागाचे अधिकारी असल्याचे चाहूल लागताच दोन आरोपी शेतामधून पळुन गेले व उर्वरीत दोन आरोपी क्र.१ संदीप श्रीपती जाधव, रा. केळेवाडी, ता. भूदरगड, वय ३२ वर्षे, आरोपी क्र.०२ योगेश आनंदा गोते, रा. केळेवाडी पैकी तोंदलेवाडी, ता. भूदरगड, वय ३४ वर्षे याना पॅशन वाहन क्र.MH०९ FE०१०३ व MH०९ DY ८८०४ या वाहनांसह ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर आरोपी यांचे मोबाईल तपासले असता सदर आरोपी यांचे मोबाईलमध्ये १५ फेब्रुवारी २०२४ रोजी २ रानडुक्करांची शिकार केलेचे दिसुन आले आहेत व साळींदर या वन्यप्राण्याच्या बिळासभोवती काट्या लावल्याचे दिसून येत आहे. त्यांचेवर वनरक्षक गडहिंग्लज यांनी WL-०६/२०२४, दि.२३/०८/२०२४ अन्वये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२, चे कलम वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९(१), ५०,५१ अन्वये गुन्हा नोंद करून दोन आरोपी यांना अटक करून मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आजरा यांचे न्यायालयात हजर केले असता दिनांक २६/०८/२०२४ रोजी पर्यंत फॉरेस्ट कस्टडी देण्यात
आली आहे. तसेच सदर गुन्हेप्रकरणी पुढील तपास चालु आहे. सदरची कारवाई जी. गुरूप्रसाद, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर, एन.एस. कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक (खा. कु.तो. व वन्यजीव) कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे मार्गदशनाखाली स्मिता.रा. डाके वनक्षेत्रपाल आजरा, बी.बी. न्हावी वनपाल गडहिंग्लज, जी.व्ही. केंद्रे वनरक्षक गडहिंग्लज, एस.एस.भंडारी वनरक्षक
मासेवाडी, टी.एस.लटके वनरक्षक आजरा व वनमजूर यांनी केली असून पूढील तपास चालू आहे.
