Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रभूमि अभिलेख कामकाजा विरोधात.- आंदोलकांची तब्येत बिघडली आरोग्य विभागाने केले उपचार.🛑रानडुक्कर वन्यप्राण्याची...

भूमि अभिलेख कामकाजा विरोधात.- आंदोलकांची तब्येत बिघडली आरोग्य विभागाने केले उपचार.🛑रानडुक्कर वन्यप्राण्याची शिकार करून तस्करी करताना आजरा वनविभागाच्या ताब्यात

🛑 भूमि अभिलेख कामकाजा विरोधात.- आंदोलकांची तब्येत बिघडली आरोग्य विभागाने केले उपचार.
🛑रानडुक्कर वन्यप्राण्याची शिकार करून तस्करी करताना आजरा वनविभागाच्या ताब्यात

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील देवर्डे येथे रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करून रानडुक्कर वन्यप्राण्याची तस्करी करताना वनविभागाने आरोपीना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दि. २३/०८/२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनूसार परिक्षेत्र वनअधिकारी आजरा यांचे सुचनेनूसार वनपाल धनगरमोळा, वनपाल दक्षिण आजरा, वनरक्षक मडिलगे, वनरक्षक गवसे अति. हाळोली, वनरक्षक पारपोली, वनरक्षक धनगरमोळा, यांनी मौ. देवर्डे येथील फॉरेस्ट कंपार्टमेंट क्रमांक २१४ मध्ये जागोजागी सापळा लावला असता रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करून रानडुक्कर या वन्यप्राण्याची तस्करी करताना दुचाकी स्वार आढळले सदर दुचाकीस्वार यांना चौकशी कामी अडवले असता त्यांनी शिकार केलेला रानडुक्कर या वन्यप्राण्यास रस्त्यावर टाकून पळून गेले सदर शिकारीबाबत वनपाल धनगरमोळा यांनी अधिक चौकशी केली असता देवर्डे येथील अशोक परसू गुरव यांचे शेतामध्ये तारेने शॉक लावून रानडुक्कर या वन्यप्राण्याला मारले असल्याचे कबूली अशोक परसू गुरव रा. देवर्डे यांनी दिली आहे. दुचाकीस्वार यांचेबाबत अशोक परसु गुरव यांचेकडे चौकशी केले असता संबंधित दुचाकीस्वार रा. चांदेवाडी येथील असलेचे कळाले त्यानुसार मौ. चांदेवाडी येथे दुचाकीस्वार विशाल विलास जाधव, रा. चांदेवाडी व अशोक जानबा गिलबिले रा. चांदेवाडी यांना मौ. चांदेवाडी गावातून ताब्यात घेणेत आले असून आरोपी यांचेकडून १ मृत रानडुक्कर, हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल क्र. MH०९ AX १६५, मोबाईल – ०३ इ. साहित्य मिळून आले. त्यांचेवर वनरक्षक हाळोली यांनी WL-०२/२०२४, दि.२३/०८/२०२४ ने गुन्हा नोंद करून सदरचे साहित्य जप्त करणेत आले आहे. सदरची कारवाई ही जी गुरूप्रसाद, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर एन.एस. कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक (खा.कु.तो. व वन्यजीव) कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे मार्गदशनाखाली स्मिता.रा. डाके वनक्षेत्रपाल आजरा, श्री. एस. के. निळकंठ, वनपाल दक्षिण आजरा, श्री. भरत रा. निकम वनपाल धनगरमोळा, गुरूनाथ नावगेकर वनरक्षक पारपोली, दिपक अं कदम वनरक्षक धनगरमोळा, प्रियांका पाटील वनरक्षक मडिलगे, गणेश लहाणे वनरक्षक हाळोली अति. व वनसेवक रमेश पाटील यांनी केली असून अधिक तपास चालू आहे.

🛑 भूमि अभिलेख कामकाजा विरोधात.- आंदोलकांची तब्येत बिघडली आरोग्य विभागाने केले उपचार.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी व दोषींवर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी आजरा तहसील कार्यालयासमोर चार दिवसापासून आंदोलन चालू आहे. वारा, पाऊस, बदलते वातावरण यामुळे आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर
मा.तहसीलदार माने साहेब व पोलीस प्रशासन यांनी आरोग्य विभागास पाचारण केले व उपचार केले. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाच्या मार्फत कांहीच हालचाली दिसत नाहीत सदर कार्यालयास कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. उलट ग्रामपंचायत कार्यालयावर नोटीस चिकटवून कागदी घोडे नाचविले जात आहेत. चुकीचे काम करणाऱ्या मोजणीदार यांच्यावर कार्यवाही झाल्याशिवाय व इतर तालुक्यातील मोजणीदार लावून शेतकऱ्यांना फेर मोजणी करून न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. उपचारानंतर आंदोलकांनी तहसीलदारसो व आरोग्य विभाग यांचे मार्फत तातडीने केलेल्या हालचाली बाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिलेला आहे. आंदोलन असे चालू राहिल्यास त्याचं उग्र आंदोलनात रूपांतर होण्याची शक्यता वाढत आहे अशी माहिती शिवाजी गुरव यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.