Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा - गडहिंग्लज राष्ट्रीय मार्गावरील मडिलगेत बस स्थानक.( विना - थांबा) अद्याप...

आजरा – गडहिंग्लज राष्ट्रीय मार्गावरील मडिलगेत बस स्थानक.( विना – थांबा) अद्याप नाहीच का.?

आजरा – गडहिंग्लज राष्ट्रीय मार्गावरील मडिलगेत बस स्थानक.( विना – थांबा) अद्याप नाहीच का.?

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा गडहिंग्लज या संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गावरील मडिलगे ता. आजरा गाव येथे अद्यापही बसस्थानक झालेले नाही.‌ आजरा ते गडहिंग्लज या महामार्गावर सर्व गावानजीक विना थांबा बस स्थानके झाले आहेत. पण मडिलगे येथील बस स्थानक का झाले नाही. असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यामागील नेमका सावळा गोंधळ काय आहे. एकीकडे ज्या ठिकाणी विना थांबा बस स्थानके झाले आहेत. गरज आहे त्या विरुद्ध दिशेला आहेत. अर्थात खेडे येथे झालेले बस स्थानक हे गडहिंग्लज ज्या दिशेला झाले आहे त्यांना अधिक गरज आहे. आजाराकडे, तसेच हाजगोळी येथील बस स्थानक अशा दिशेला आहे. तर सुलगाव येथील गडहिंग्लज दिशेला पाहिजे असताना आजरा नजीक असताना देखील आजरा दिशेला बस स्थानक केले आहे. मुळात हे बस स्थानक ऊन वारा पाऊस तिन्ही गोष्टीचा संरक्षण न करू शकणार आहे.. या बस स्थानकात चारी दिशेने पाऊसही लागतो उन व वारा लागतो मग बस स्थानक शोभेसाठी आहे. का.? गरज आहे.. ज्या गावची लोकसंख्या जास्त आहे त्या गावात बस स्थानक नाही. येथील शालेय विद्यार्थी रोज आजाराकडे जाण्यासाठी समोरील घराच्या छपराखाली किंवा हॉटेलमध्ये थांबतात.. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी अगोदर आजराकडे जाण्यासाठी बस स्थानक व्हायला पाहिजेत अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून होत आहे.. त्याचबरोबर जितके विद्यार्थी आजरा कडे प्रवास करतात त्यापेक्षा कमी प्रमाणात असेना पण नियमित प्रवास करणारे नागरिक व विद्यार्थी हे गडहिंग्लज कडे देखील आहेत. यामुळे दोन्ही बाजूला बस स्थानक व्हावे. अशी या मडिलगे गावातील विद्यार्थ्यांच्याकडून मागणी होत आहे. तरी संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग मधील प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांनी या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक पहावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.