उद्योजक मानसिंग खोराटे यांना पाठिंब्याचे सत्र कायम.
( चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध संस्था, तरुण मंडळे, विविध समाजाचा, शेतकरी संघटना, कामगार, ऊस उत्पादक यांचा श्री. खोराटे यांना वाढता पाठींबा.)
चंदगड.- प्रतिनिधी.

चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध संस्था, तरुण मंडळे, समाजाचा, शेतकरी संघटना, कामगार, ऊस उत्पादक यांचा यशस्वी उद्योजक दौलत साखरेचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना वाढता पाठींबा मिळत आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेच्या बळावर मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे मागील पंधरा दिवसापूर्वी अथर्वचे उद्योजक – दौलतचे चेअरमन श्री. खोराटे यांनी जाहीर केले होते. यानंतर चंदगड मध्ये नागरिकांचा सोशल मीडियावर प्रतिक्रिया व शेतकरी, सभासद, संघटना तसेच समाजातून वाढता पाठिंबा मिळताना दिसतो आहे. चंदगड तालुका विश्वकर्मा सुतार-लोहार समाजाने उद्योजक श्री.खोराटे यांची कारखाना स्थळावर भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
यामध्ये विश्वकर्मा सुतार-लोहार समाजाने श्री खोराटे यांना बिनशर्त पाठींबा दिला.
यावेळी सुतार-लोहार समाजाच्या अनेक समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यात आली. समाजासाठी आवश्यक सुविधा, रोजगाराच्या संधी यावर सविस्तर विचार मंथन करण्यात आले. समाजाच्या भविष्यासाठी आणि एक चांगला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपण श्री खोराटे यांना पाठिंबा देत असल्याचे यावेळी अध्यक्ष सुरेश सुतार यांनी जाहीर केले आहे.
उद्योजक मानसिंग खोराटे यांना चंदगड विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा युवा अध्यक्ष जगन्नाथ हुलजी माजी सभापती. यांनी जाहीर करत आपण चांगल्या व्यक्तीला शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक व आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेला चंदगड मतदारसंघाचा विकास या धरतीवर पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. तसेच दौलतचे कामगार यांनी देखील त्यांच्या मागण्या समाधानकारक मान्य होत असल्याने. व कारखाना सुशिक्षित सुरळीत चालू राहावा या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून कामगार व ऊस उत्पादक शेतकरी यांनीही पाठिंबा दिला आहे. सतीश सबनीस मधुकर पाटील कृष्णा पाटील हनुमंत सावंत राजू देवळी धोंडीबा चौगुले चावा पेडणेकर बाळू चव्हाण, बाळाराम फडके, प्रकाश कांबळे, चांदोबा सुतार, पिंटू गुरव, सह चंदगड तालुक्यातील शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला होता. या पाठिंबाचे सत्र चालूच आहे. पण उमेदवारी कोणत्या पक्षाकडून होते याबाबत अजूनही तर्कवितर्क चालू आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट, किंवा शेतकरी संघटना या पक्षाची उमेदवारी मिळणार असल्याचे तर्क- वितर्क चंदगड तालुक्यात चालू आहेत.
