Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रचंदगड विधानसभा.- उद्योजक दौलत साखरचे चेअरमन मानसिंग खोराटे लढवणारच .- नव्या चेहऱ्याची...

चंदगड विधानसभा.- उद्योजक दौलत साखरचे चेअरमन मानसिंग खोराटे लढवणारच .- नव्या चेहऱ्याची चंदगडच्या राजकारणात होणार एन्ट्री. कोणता पक्ष अद्याप स्पष्टता नाही..

चंदगड विधानसभा.- उद्योजक दौलत साखरचे चेअरमन मानसिंग खोराटे लढवणारच .- नव्या चेहऱ्याची चंदगडच्या राजकारणात होणार एन्ट्री.

चंदगड.- प्रतिनिधी.

Oplus_0

उद्योजक व दौलत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांची चंदगड विधानसभा मतदारसंघात राजकीय एंट्री सोबत विधानसभा लढवणार असल्याचे आज बुधवार दि. ३१ रोजी दौलत कारखाना साईट झालेल्या मेळावा व पत्रकार परिषदेमध्ये श्री खोराटे यांनी जाहीर केले. स्वागत व प्रास्ताविक एडवोकेट संतोष मळवीकर यांनी केले. चंदगड विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित तरुण वर्गाने आपण ही विधानसभा निवडणूक लढवून राजकारणात एन्ट्री का ? करावी लागते याबाबत आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.
यावेळी श्री खोराटे म्हणाले दौलत साखर कारखाना चालवत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. हा कारखाना चालू होऊन शेतकरी व कामगार वर्गाचा फायदा होताच पण अनेक राजकीय लोकांच्या कर्तुत्वाने राजकारण कारखान्यात येऊ लागले मी अनेक विरोध करणाऱ्या सक्षम होतोच व आजही आहे परंतु एखाद्या राजकीय क्षेत्रात काम करत असताना फारसा विरोध होत नाही. यामुळे आपल्या म्हणण्याप्रमाणे मी राजकारणात एन्ट्री करत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेत आहे. अनेक वेगवेगळ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांच्याकडून उमेदवारीसाठी बोलावण्यात येत आहे परंतु योग्य वेळी योग्य असा निर्णय घेऊन आपण दिलेल्या सूचनेचे पालन करत मी विधानसभा लढवणार मागील दोन वर्षापासून नोकरी विषयक व उद्योजक मेळावा घेत तरुणांच्या हाताला काम देण्याचे कार्य केले आहे ते यापुढेही चालू राहील चंदगड आजरा गडहिंग्लज या भागात नवनवीन उद्योजक तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

Oplus_131074


यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी श्री खोराटे यांना भगवी शाल घालून मनसेची ऑफर दिली. श्री चौगुले म्हणाले जर सामाजिक बांधिलकी जपणार व तरुणांच्या हाताला काम व उद्योग अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या नवा कोरा प्लेन चेहरा मुळात कोणताही डाग नसणारा असा उमेदवार जर मनसे पक्षाला जर मिळाला व आपण इच्छुक असल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर चंदगड मतदारसंघाची व्यथा मांडून आपल्याला उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल पण यासाठी अगोदर आपण मनसे मधून लढवण्यास इच्छुक आहात का.? तत्पुरुष मी आपल्याला भविष्यात घालून आमंत्रण केल आहे. अशी न कळत मनसेमधून उमेदवारी लढवावी अशी ऑफर मनसे जिल्हाध्यक्ष यांनी मानसिक खोराटे यांना दिली आहे.
यावेळी अॅ. संतोष मळवीकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत नवा व कोरा चेहरा का? पाहिजेत याबाबत मानसिक खोराटे यांच्या कार्याचा आढावा दिला. फक्त विकास कामे म्हणजे लोकप्रतिनिधी नाही. तर मतदार संघातील सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगारांना हाताला काम किंवा नवा व्यवसाय या तालुक्यात झालेला नाही. यासाठी नवे उद्योजक व बंद पडलेला दौलत साखर कारखाना चालू करून हजारो शेतकऱ्यांना दिलासा देणारे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मानसिंग खोराटे हे डोळ्यासमोर असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असणार आहेत. असा उमेदवार ज्यांचा सार्थ अभिमान आहे.‌ चंदगड वासीयांनी व आजरा गडहिंग्लज मतदार संघातील मतदारांनी या उमेदवाराच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले. बापू शिरपूरकर, सह अनेक आजरा गडहिंग्लज चंदगड मधील तरुणांनानी आपल्या भावना व्यक्त केल्या. या मेळावा व पत्रकार परिषदेत. दोनशेहून अधिक तरुण उपस्थित होते.

चौकट.

चंदगड वासियांची भावनिक प्रतिक्रिया.

उद्योजक व चेअरमन मानसिंग खोराटे हे चंदगड विधानसभा लढवणार याबाबतची वाजवी चंदगडच्या ग्रामीण भागात समजतात ग्रामीण भागातील शेतकरी ऊस उत्पादक व तरुण वर्गांची यांचे कट्ट्या कट्ट्यावरील व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. कि मानसिंग खोराटे सारखे व्यक्तिमत्व जर या चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहून आमच्या कुटुंबाचे मतदान तर देऊच पण पै पाहुण्यांमधून पन्नास शंभर मतदान आम्ही त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न करू यापुढे त्यांनी आणखी जोमाने कारखान्यासाठी काम करावे व सर्वसामान्य शेतकरी जगला पाहिजे ही त्यांची मुळात भावना असल्याने यापेक्षा अधिक त्यांनी कारखान्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या हिताचे काम करावे.. आम्ही खोरटे साहेबांच्या सोबत आहोत. अशा भावना व्यक्त होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.