टी बी मुक्त भारत अभियानात.- ( मडिलगे गाव टीबी मुक्त करण्याचा समितीचा निर्णय.)
( टीबीचा प्रादुर्भाव संभाव्य – धोका लक्षात घेऊन. टीबी मुक्त गाव करण्याचा मानस.)
आजरा.- प्रतिनिधी.

टीबी हा संसर्गजन्य रोग असून हा आपल्यापासून दुसऱ्याला होऊ नये व आपल्या असलेला खोकला हा सौम्य आहे. म्हणून याकडे दुर्लक्ष न करता लागलीच यावरती मडिलगे उपकेंद्रातून आपण याबाबत माहिती देऊन उपचार घ्यावे. व यासाठी समितीने अशा रुग्णांना संभाव्य धोका लक्षात घेऊन पुढील धोका टाळावा यासाठी टीबी मुक्त भारत अभियानात सहभाग म्हणून आपलं आरोग्य व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासोबत इतरांना धोका होऊ नये याचे गांभीर्य लक्षात घेऊन. उपचार घ्यावे. याबाबत मडिलगे ग्रामपंचायत येथे टीबी मुक्त भारत व टीबी मुक्त गाव या अभियानाच्या समितीची स्थापना व याबाबत उपाययोजना करण्याबाबत बैठक संपन्न झाली. अध्ययस्थानी सरपंच बापू निऊगरे होते. टी बी फोरम कमिटी व उपकेंद्राचे सी. एच ओ अमोल चव्हाण ज्यांनी टीबी बाबत व आरोग्याच्या दृष्टीने हा रोग घातक असल्याने न लपवता न लाजता त्याबाबतची आरोग्य विभागाला माहिती द्यावी. सद्यस्थितीत गावात टीबीचा एकही पेशंट नसला तरी यापुढेही असेच राहून टीबी मुक्त गाव करण्यासाठी व संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण उपाय घ्यावे. यामध्ये भयभीत किंवा खचून न जाता साधारण खोकला असला तरीही आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल व आपल्याला या रोगाबाबत आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व आपण या रोगातून रोगमुक्त होण्यासाठी औषध उपचार मोफत दिले जातील. साधारण खोकला जरी असला तरी आपण लागलीच उपाय घ्यावा. कारण यामध्ये वाढ होऊन टि. बी सारख्या आजाराकडे आपण पोहोचू नये याची दक्षता घेऊन आपण उपाय करावे. अशी माहिती श्री चव्हाण व आरोग्य सेवक संभाजी लटके यांनी दिली. यावेळी सरपंच श्री निऊगरे यांनी टि. बी मुक्त गाव या अभियानात ग्रामपंचायत हिराहिरीने सहभाग घेऊन. जनजागृती करेल व समितीच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवून असे संभाव्य असणारे रुग्ण यांची काळजी घेण्यासाठी समिती सोबत काम करेल असे बोलताना म्हणाले. यावेळी

टी बी फोरम कमिटी ग्रामपंचायत सदस्य मडिलगे. पांडुरंग जाधव सचिव ( उपसरपंच ) व्ही.जी. हातळगे वैद्यकीय अधिकारी, राहुल सुतार ग्रामसेलक, डॉ. बळीराम पाटील, मुख्याध्यापक श्रीधर मांगले, दिपाली गोईलकर आरोग्य सेविका, सह अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, आशा सेविका संगीता पाटील वैशाली येशणे, सुमन कुंभार, वैभवी मुंज, पत्रकार संभाजी जाधव, संदेश हाटवळ, संग्राम पाटील, काजल देसाई यावेळी उपस्थित होते. आरोग्य सेविका गोविलकर यांनी आभार मानले.
