Homeकोंकण - ठाणेभरदिवसा गोळीबार, पोलिस सुस्त.- पालकमंत्र्यांनी दिले उचलबांगडीचे निर्देश !

भरदिवसा गोळीबार, पोलिस सुस्त.- पालकमंत्र्यांनी दिले उचलबांगडीचे निर्देश !

🟥भरदिवसा गोळीबार, पोलिस सुस्त.- पालकमंत्र्यांनी दिले उचलबांगडीचे निर्देश !

बल्लारपूर.- प्रतिनिधी.

पोलिस हा गुन्हेगारांचा कर्दनकाळ असतो. वर्षानुवर्षांपासून आपण हेच बघत आलो आहोत. पण एखाद्या गंभीर गुन्ह्यात सामील असलेल्या गुन्हेगाराला पोलिसच पाठीशी घालत असले तर मात्र स्थिती गंभीर होते. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे भरदिवसा बाजारात गोळीबार करण्यात आला. पण पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही.

🔴बल्लारपूरच्या बाजारपेठेत भरदिवसा गांधी चौक या गजबजलेल्या परिसरात दुकान जाळण्याचा प्रयत्न केला गेला. बेछूट गोळीबार करण्याची गंभीर घटना घडली. ही घटना पोलिसांकडून अत्यंत निष्काळजीपणे हाताळली गेली. परिणामी जनतेत रोष निर्माण झाला. यास जबाबदार असलेले पोलिस निरीक्षक आसिफरझा शेख यांची तात्काळ बदली करा, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर पोलिस अधीक्षकांना दिले.

🟥6 जुलै 2024 रोजी बल्लारपूर येथील मालु वस्त्र भंडार येथे अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल बॉम्ब टाकून दुकान जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोळीबारसुद्धा करण्यात आला. त्यामुळे व्यापारी वर्गात व सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निमार्ण झाले. या घटनेतील गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली होती.

🔴बल्लारपूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक आसिफरझा शेख यांनी हे प्रकरण अत्यंत निष्काळजीपणे हाताळले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे गुन्हेगारांना अभय मिळत राहिले. शेख यांच्या कृतीमुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला. शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांचा कायद्यावरचा विश्वास उडायला लागला. याच्या तक्रारी नागरिकांनी थेट पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्या. त्यांनीही तक्रारींची दखल घेतली.

🟥या संपूर्ण परिस्थितीसाठी जबाबदार असलेले पोलिस निरीक्षक आसिफरझा शेख यांची बदली करण्याची मागणी लोकप्रतिनीधींकडूनदेखील करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी स्वतः या प्रकाराची माहिती घेतली. आणि पोलिस अधीक्षकांना पत्र देऊन पोलिस निरीक्षक आसिफरझा शेख यांची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता लवकरच शेख यांची उचलबांगडी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.