Homeकोंकण - ठाणेतेढ निर्माण करणारे फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्यास फौजदारी.- विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर...

तेढ निर्माण करणारे फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्यास फौजदारी.- विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश( विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कलम १६३ लागू )🛑पोलिस भरतीत मराठा उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ नाहीच!.- अपर पोलिस महासंचालकांचे पत्र.( कोल्हापुरात २३ उमेदवार.)🟥’बाहुबली’सारखं धबधब्याजवळ शूट करायला गेली,- मुंबईकर रिलस्टार 350 फूट खोल कोसळली.👇

कोल्हापूर :- प्रतिनिधी.

Oplus_0

किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणाबाबत काही घटकांकडून सामाजिक तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण, चित्रीकरण, छायाचित्रे समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात कलम १६३ लागू केले आहे. याअंतर्गत इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुकद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे, तसेच बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास सक्त मनाई केली असून, तसे आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
🔴विशाळगड येथे अनधिकृत अतिक्रमणाविरोधात रविवारी झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने जिल्ह्यातील वातावरण बिघडले आहे. कार्यकर्त्यांनी अचानक दगडफेक करून सार्वजनिक शांततेचा भंग केला, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करून नुकसान केले. वरील सर्व घटनांचे व्हिडीओ, रील्स, फोटो काही लोक सोशल मीडियामार्फत, तसेच प्रसारमाध्यमामधून पसरवून समाजामध्ये अस्थिरता निर्माण करीत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून प्रक्षोभक संदेशाद्वारे अफवा पसरविल्या जात आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट, स्टेटस ठेवून तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे कलम लागू केले आहे.

🟥पोलिस भरतीत मराठा उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ नाहीच!.- अपर पोलिस महासंचालकांचे पत्र.
( 🟣कोल्हापुरात २३ उमेदवार.)

कोल्हापूर :- प्रतिनिधी.

पोलिस भरतीसाठी ईडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्याऐवजी एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिक इतर मागास प्रवर्ग), ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) आणि खुल्या प्रवर्गाची निवड करावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी मंगळवारी (दि. १६) जारी केले. त्यामुळे पोलिस भरतीचा निकाल लांबणार असून, मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
🛑राज्यातील १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, अनेक मराठा उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रक्रियेत सहभाग घेतला. काही जिल्ह्यांत मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षाही झाली. आरक्षित जागांनुसार अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच अपर पोलिस महासंचालकांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाबद्दल महत्त्वाचे परिपत्रक काढले आहे.
🟥ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना या प्रवर्गाऐवजी एसईबीसी, ओबीसी किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय द्यावा. त्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्याचे निर्देश सर्व पोलिस अधीक्षक कार्यालये आणि पोलिस आयुक्तालयांना दिले आहेत. निवड होणाऱ्या उमेदवारांना एसईबीसी किंवा ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत मिळणार आहे.

🔴कोल्हापुरात २३ उमेदवार.

कोल्हापुरात पोलिस शिपाई पदाच्या १५४ जागांसाठी झालेल्या प्रक्रियेत ईडब्ल्यूएस प्रवर्गातून २३ उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांना बोलवून घेऊन ईडब्ल्यूएसऐवजी अन्य प्रवर्गांचा पर्याय दिला जाणार आहे. तसेच उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.

🟥’बाहुबली’सारखं धबधब्याजवळ शूट करायला गेली,- मुंबईकर रिलस्टार 350 फूट खोल कोसळली

रायगड :- प्रतिनिधी.

सह्याद्रीतील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्यात हीच सह्याद्री सर्वत्र हिरवाईने नटलेली असते. त्यासोबतच धबधब्यांची माळ आपल्या शिरावरून जमिनीला स्पर्श करण्यासाठी नेहमीच साथ घालत असते.हे सर्व पाहून तरुणाईला आपल्या मोहावर आवर घालता येत नाही. मग धबधब्यामध्ये पोहण्याचा आनंद असो अथवा निसर्गाचा अद्भुत दृश्य पाहण्याचा अनुभव असो. परंतु, हे सर्व करत असताना काही अतिउत्साही पर्यटक आपल्या जीवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशातच आपला जीव गमावतात. असाच काहीसा प्रसंग हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या कुंभे धबधबा येथे घडला.

🔴रील बनवण्याच्या नादात गमावला जीव

वर्षा पर्यटनासाठी सीए असलेली 27 वर्षांची तरुणी मुंबई येथून आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी कुंभे धबधबा येथे आली होती. धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या सुळक्यावरती जाऊन रील काढण्याचा मोह तिला आवरता आला नाही. व्हिडीओ काढण्याच्या नादात ती त्या ठिकाणी गेली. दुर्दैवाने तिथे गेल्यानंतर तिचा पाय निसटून ती थेट 350 फूट खोल दरीमध्ये पडली. सोबत असलेल्या मित्रांनी त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाणे येथे दिली. माणगाव पोलीस ठाणे येथील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पीआय निवृत्ती सर आणि एपीआय नरेंद्र सर यांनी घडलेल्या घटनेची माहिती जवळच्या सर्व रेस्क्यू टीमला दिली. ही माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड यांनी लगेचच घटनेच्या दिशेने धाव घेतली. जवळपास 12.30 च्या सुमारास रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली स्थितीचा आढावा घेतल्यानंतर बचाव कार्य सुरू केले.

🟥उपचारादरम्यान मृत्यू

खाली उतरत असताना मोठ-मोठे दगड आमच्या अंगावरती पडत होते. अवघ्या 15 मिनिटात टीम त्या तरुणीच्या जवळ पोहोचली. पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित ती जिवंत नसावी. परंतु, जवळ जाऊन तिचा श्वास तपासल्यानंतर ती जिवंत असल्याची खात्री झाली. तिला हाक दिल्यानंतर ती हलका आवाजात साथ देत होती. लगेचच जखमी तरुणीला सुरक्षितरित्या स्ट्रेचरवरती बांधण्यात आले. धारणपणे 120 मीटरच्या अंतरावरती हाताने उचलून तिला जवळील मार्गावरती आणले. त्यानंतर दोरीच्या साह्याने जवळपास 200 ते 250 फूट उंच कड्यावरून तिला वरती नेण्यात आले. जखमी तरुणीला माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. अन्वी कामदार असं मृत तरूणीचं नाव आहे. मुंबईतल्या माटुंगा इथून पावसाळी पर्यटनासाठी ती आली होती. ती व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आहे. फेसबुक आणि इतर ठिकाणी तिचे लाखोंने फॉलअर्स आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.