आजरा. प्रतिनिधी
चाफ्याच्या विहिरी नजीक असलेली दुर्गंधी स्वच्छता करावी व तारेचे कुंपण करावे होणेवाडी ग्रामस्थांची मागणी. अन्यथा आंदोलन.

आजरा महागाव रोडवर होनेवाडी ग्रामपंचायत हद्दी नजीक वनविभागाच्या हद्दीत व चाफ्याची भाव या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वनविभाग आजरा मार्फत येथे सूचना फलक लावले जात असताना देखील येथे रस्त्याच्या बाजूला खोल दरीत पोल्ट्री व्यवसायातील मृत, कोंबड्या, खराब झालेली अंडी, मृत जनावरे, वैद्यकीय उपकरणे, सिरींज इत्यादी गोष्टी राजरोसपणे टाकले जातात. या दुर्गंधीमुळे तेथून जाणे अडचणीचे झाले आहे. मृत जनावरे टाकली गेली होती सदर मृत जनावर ज्या वाहनातून आणली गेली व तेथे टाकली गेली त्याची छायाचित्रे होनेवाडी ग्रामपंचायत मार्फत वनविभागाकडे दिली गेली असे असताना त्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.
या अशा कृत्यांना वनविभागाकडून दंडात्मक कारवाई करावी व तेथे कायमचे तारेचे कंपाऊंड करावे अशी मागणी होनेवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ मार्फत केली जात आहे. यावेळी
सरपंच श्रीमती प्रियंका चंद्रकांत आजगेकर, सदस्य कृष्णा पाटील, गंगाधर बटकडली, पोलीस पाटील रणजीत सुतार,
ग्रामस्थ विश्वास सुतार, गणेश आजगेकर सह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट.
दिशा नसणारे दिशादर्शक फलक. – सावधान.- सदर क्षेत्र वनविभागाच्या ट्रॅप आणि सेटेलाईट कॅमेऱ्याच्या नजरकक्षेत येते. जंगल क्षेत्रात आग लावताना शिकार करताना, कचरा टाकताना आढळल्यास त्या व्यक्तीवर भारतीय वन अधिनियम 1972 चे कलम 51(1) प्रमाणे जास्तीत जास्त तीन वर्षे कारावास / पंचतीस हजार रुपये दंड या शिक्षेस पात्र राहील.
जंगलाला वनवा लावलेला निदर्शनास आल्यास वन विभागाच्या 1926 या हेल्पलाइन नंबर वर तत्काळ संपर्क साधावा.. असे लिखाण केलेला फलक ज्या ठिकाणी लावलेले आहेत. परंतु आजपर्यंत सॅटॅलाइटच्या माध्यमातून किती जणांच्या वर कारवाई केली. याबाबत काही कल्पना नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
वैद्यकीय व अभियांत्रिकी, उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रवेशाबाबत – आजरा मराठा महासंघाचे निवेदन
आजरा.- प्रतिनिधी.

वैद्यकीय व अभियांत्रिकी, उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रवेशाबाबत – आजरा मराठा महासंघाने आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी तसेच इतर उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रवेशासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सामईक प्रवेश परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर सन २०२३ पासून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट (NEET) ही केंद्रीय प्रवेश परीक्षा सुरू करण्यात आली. परंतु यानीट (NEET) परीक्षेमुळे आपल्या महाराष्ट्रातील हुशार, होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांच्यावरती खूप अन्याय झाल्याचे दिसून येते.
अखिल भारतीय पातळीवरती नीट (NEET) परीक्षा होते. या स्पर्धेत आपल्या ग्रामीण भागातील मुले बुद्ध्यांक चांगला असूनदेखील मागे पडत आहेत. महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्याना प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. इतर राज्यातील मुले या जागांवरती प्रवेश घेत आहेत. परिणामी महाराष्ट्रातील आपल्याच मुलांवर वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यास्तव महाराष्ट्रीयनांच्या आरोग्य सेवेवरती याचा गंभीर परीणाम झाल्याचे दिसून येते. कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले. यास्तव अनेक कुटुंबे उघड्यावर पडली हे सत्य नाकारता येत नाही. पूर्वी बाहेरील राज्यातील मुलांसाठी महाराष्ट्रतील वेद्यकीय महाविद्यालयां मध्ये १५% (पंधरा टक्के) इतका केंद्रीय कोटा होता. तो कोटा पूर्ण न झाल्यास शेवटी महाराष्ट्रातील मुलांना मेरीटनुसार प्रवेश दिला जात होता. पण आता ते होतान दिसत नाही. शिवाय सामईक प्रवेश परीक्षेवेळी अनेक प्रकारचे घोळ होत आहेत. विशिष्ट लोकांपुरतेव वैद्यकीय शिक्षण मर्यादित राहत आहे. याचा फटका महाराष्ट्रातील गोर-गरीब विद्यार्थ्यांना बसताना दिसतोय. चांगली गुणवत्ता असूनदेखील ही मुले मागे पडत आहेत. याचा वाईट परीणाम त्यांच्या मानसिकतेवरती होत आहे. या सर्व व्यवस्थेबद्दल पालकांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वैद्यकीय सेवा सुरळीत व्हावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करत आहोत असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर
वसंतराव मुळीक राष्ट्रीय उपाध्यक्ष, मारुती मोरे जिल्हा अध्यक्ष, अगोल बांबरे युवा अध्यक्ष, शंकरराव शिंदे उपाध्यक्ष
संभाजीराव इंजल कार्याध्यक्ष, मिनल इंजल महिला अध्यक्षा
काशिनाथ देसाई चिटणीस,राजेंद्र कोंढरे राष्ट्रीय अध्यक्ष
शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष,भैरवी सावंत महिला जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रकांत देसाई जिल्हा उपाध्यक्ष, बंडोपंत चव्हाण अध्यक्ष यांच्या सह्या आहेत.
आजरा शहरातील पाईपलाईन व पडलेले खड्डे ताबडतोब मुजवून घ्यावे.- आजरा नगरपंचायत ला समितीचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरातील साई कॉलनी, भारतनगर व आझाद कॉलनीमध्ये नवीन पाणी पुरवठा करणेसाठी खुदाई करणेत आली आहे. त्यामुळे कॉलनीमधील रस्त्यावर पाणी साचून बरेच खड्डे पडलेले आहेत. पहिल्याच पावसात या रस्त्यावर पाणी साचलेने खुदाई केलेल्या मातीमुळे चिखलाचे साम्राज्य झाले आहे. सदर खड्डे मुरमाने भरून पाणी साचणार नाही अशी व्यवस्था केलेस चिखल होणार नाही व वाहतुकीसाठी अडचण निर्माण होणार नाही. तरी वाढीव वसाहतीमध्ये पहाणी करुन स्थानीक लोकांचेकडून चौकशी करुन लवकरात लवकर मुरुम टाकणेची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे जनावरांच्या बाजारा शेजारील धोकादायक मोरी (तयार केलेला स्पीड ब्रेकर) दुरुस्तीबाबत निवेदन देऊन सुध्दा अद्याप त्याकडे लक्ष दिलेले नाही. तरी लवकरात लवकर त्याची दुरुस्ती व्हावी, तसेच दरवाजकर कॉलनीमधील पाण्याची जुनी पाईपलाईन कॉन्ट्रॅक्टर यांनी फोडली आहे. ती दुरुस्त करणेत यावी. नवीन पाईप बसविताना बऱ्याच ठिकाणी काम करताना जुन्या पाईपलाईन फुटल्या जातात त्या दुरुस्तीसाठी वारंवार कॉन्ट्रॅक्टरवर व नगरपंचायतीच्या कामगारांना सांगून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सदर दुरुस्ती पाठलाग करून सुध्दा दुरुस्ती वेळेत करत नाहीत. संबंधीताना आपणाकडून सूचना देणेत याव्यात. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर
परशुराम बामणे, पांडूरंग सावरतकर, जावेद्र पठाण, नाथा देसाई, संतोष बांदीवडेकर, गौरव देशपांडे, परेश पोतदार, अभिजित संकपाळ, राजु विभुते, संजय जोशी, संदीप पारळे सह समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत.