संवेदना फाऊंडेशनचा कोरोना रुग्णांना मायेचा आधार.- ड्राय फ्रुट्स, राजीगरा लाडू ससॅनिटायझर रुग्णांच्या हातात भेट.
आजरा. प्रतिनिधी. १३.
आजरा तालुक्यातील संवेदना फाऊंडेशन सामाजिक बांधिलकी जपणारे फाऊंडेशन म्हणून पाहिले जाते. कोल्हापूर जिल्हासह राज्यात नावारूपाला येत आहे. कोव्हिड १९ महामारीच्या काळात समाजातील लोकांच्या संवेदना लोप पावत चाललेल्या आहेत याची आपण बरीच उदाहरणे पाहत आहोतच पण दुसरीकडे संवेदना फाऊंडेशन नागरिकांमध्ये संवेदना जागृत करण्याचे काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून दि.१३ रोजी आजरा तालुक्यातील चार कोविड सेंटर मध्ये यामधील शासकीय कोविड सेंटर, रोझरी कोविड सेंटर आजरा, कै.मुकुंद दादा आपटे व हसन मुश्रीफ कोविड सेंटर उत्तुर येथील दाखल कोरोणा रुग्णांना २०० ग्रॅम ड्राय फ्रुट्स, राजीगरा लाडू आणि कोविड सेंटरना प्रत्येकी २५ लीटर सॅनिटायझर फाऊंडेशनचे सर्व डॉक्टर्स सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करून एक सामाजिक भान जपलेले आहे.
संवेदना फाऊंडेशन गेली सहा सात वर्षे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात चांगल्या प्रकारे कार्य करत आहे त्यामध्ये वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करणे,तालुक्यातील शाळांना संगणक आणि प्रथमोपचार पेटी यांचे वाटप करणे,अनाथ गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे,यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे,महापुरात नुकसान झालेल्या लोकांना प्रत्यक्ष जाऊन मदत निधी वाटप करणे,पोलिसमित्र म्हणून कार्य करणे अशी अनेक कामे संवेदना फाऊंडेशन सतत करत असते. संवेदना फाऊंडेशनचे कार्यकारी सदस्य प्रा. सुरेश देशमुख तसेच तानाजी पावले यांनी फाऊंडेशनची माहिती दिली.
यावेळी आजरा तालुक्यातील संवेदना सदस्य डॉ.सागर तेऊरवाडकर,डॉ.निलेश भारती, डॉ.इंद्रजित देसाई, डॉ.सागर पारपोलकर,डॉ.सुरजित पांडव, डॉ.मधुसूदन कुंभार, डॉ.बळीराम पाटील, डॉ.प्रवीण निंबाळकर, डॉ.निखिल हरेर तसेच सर्व डॉक्टर्स संवेदना फाउंडेशन चे सदस्य संजय हरेर,शशिकांत पंडित,राजेश हरेर,किशोर गिलबिले,अरविंद आजगेकर,समीर चव्हाण,घनश्याम देसाई,सुधाकर प्रभू,अमोल भांबरे,संतोष शिवणे,युवराज तीप्पे,हणमंत सुतार,मंदार हळवणकर,महेश कांबळे,तानाजी गिरी,संतोष कदम,सचिन परीट इ. मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अमोल भांबरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले..
