Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपुरे झाले… तुम्ही लढा आम्ही बघ्याची भूमिका घेतो.- सर्वपक्षीय टोल आंदोलनात तालुक्यातील...

पुरे झाले… तुम्ही लढा आम्ही बघ्याची भूमिका घेतो.- सर्वपक्षीय टोल आंदोलनात तालुक्यातील वाहनधारकांची उपस्थिती महत्त्वाची.‌🛑आजऱ्यातील रामतीर्थाच्या धोकादायक वळणावर फणस विक्री कडे – नगरपंचायतचा कानाडोळा.का?

🛑पुरे झाले… तुम्ही लढा आम्ही बघ्याची भूमिका घेतो.- सर्वपक्षीय टोल आंदोलनात तालुक्यातील वाहनधारकांची उपस्थिती महत्त्वाची.‌
🛑आजऱ्यातील रामतीर्थाच्या धोकादायक वळणावर फणस विक्री कडे – नगरपंचायतचा कानाडोळा.का?

आजरा.- संभाजी जाधव.

आजरा तालुक्यातील टोलनाका हद्दपार व्हावा. या आंदोलनात तालुक्यातील सर्व वाहनधारकांनी सहभाग नोंदवल्यास आंदोलन अधिक बळकट होणार आहे.
स्थानिक रहिवाशांना टोल माफी नाही. तर मग हा टोल कशासाठी हवा टोलच हद्दपार करू हे आंदोलन हातात घेत असताना कोणी एकाला टोल माफी व्हावी. म्हणून ही आंदोलन नसून तालुक्यातील स्थानिक रहिवासी यांना जर टोल पासूनच मुक्ती हवी असेल तर तालुक्यातील प्रत्येक वाहनधारकाने या आंदोलनात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. कोणीतरी आंदोलन करेल व टोल हद्दपार होऊन आम्हाला टोल मुक्ती मिळेल. प्रत्येक वेगवेगळ्या आंदोलनात अशीच भूमिका असते. त्या आंदोलनाकडे नागरिकांचे फारसे लक्ष नसते उलट आंदोलनकर्त्यांचा रास्ता रोको असल्यास सदर आंदोलन स्वतःच्या न्याय – हक्कासाठी असताना देखील थोडा वेळ रस्त्यात थांबल्यास त्यांच्या कामात अडथळा निर्माण होतो. सदर आंदोलन हे स्वतःसाठीच असते त्याचे भान नसते आता हे पुरे झाले. होऊ घातलेले टोल आंदोलन हे तालुक्यातील सर्व वाहनधारकांसाठी आहे. सर्वपक्षीय या आंदोलनाला तालुक्यातील सर्वच वाहनधारकांनी उपस्थित लावल्यास सदर आंदोलन बळकट होणार आहे.
स्थानिक रहिवाशांना टोल माफ व्हावा. तर हा लढा सुरुवातीपासूनच मजबूत करण्यासाठी आजरा तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्वपक्षीय वाहनधारकांनी यामध्ये सहभाग नोंदवून आंदोलनाला उपस्थिती दर्शवली पाहिजे.
सुरुवातीला हा टोल नाका सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा सीमेवर व्हावा. याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निवेदन दिले होते याचवेळी जर हा लढा अगदी मजबूत होऊन आजरा एमआयडीसीत अधिकृत झालेला टोल नाका स्थलांतर झाला असता. तर आज स्थानिक वाहनधारकांना टोल माफी करावी, टोल नाका हातभार करावा याबाबत आंदोलन करण्याची गरज भासली नसती परंतु यावेळी फक्त निवेदन दिले आंदोलनाचा लढा उभारला नाही. तोपर्यंतच लोकसभेची आचारसहिता लागली. आता अधिकृत टोलनाका तर झालाच परंतु आजच स्थानिक वाहन धारकांना कायमस्वरूपी टोल माफी व्हावी. लढा तीव्र होणे गरजेचे आहे.
संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचे अंदाजे अजूनही ३० टक्के काम शिल्लक असताना कदाचित टोलनाक्याचे काम पूर्ण झाल्यास टोल घेण्यास चालू देखील केला जाईल असा अंदाज आहे. तत्पूर्वी टोल नाका स्थलांतर करावा याबाबत निवेदन दिले असताना देखील आपण जर या ठिकाणी टोलनाका केला आहात तर स्थानिक वांधारकांना टोल माफी मिळालीच पाहिजेत. या मतावर आजरा तालुक्यातील वाहनधारकांनी ठाम राहून आंदोलनाचा लढा एकजुटीने दिला पाहिजेत.. अन्यथा कायमस्वरूपी आपल्या डोक्यावर टोल बसेल….

🛑आजऱ्यातील रामतीर्थाच्या धोकादायक वळणावर फणस विक्री कडे – नगरपंचायतचा कानाडोळा.का?

आजरा.- संभाजी जाधव.

Oplus_131074

आजरा नगरपंचायत हद्दीतील रामतीर्थ या महामार्गाच्या वळणावर फणस विक्रेते फणस विक्री करत आहेत. शेतकऱ्याच्या फनस विक्रीला विरोध नाही. परंतु या वळणावर अनेक वाहने फणस घेण्यासाठी रस्त्यावर थांबलेली असतात. यामुळे सद्या नव्याने राष्ट्रीय महामार्ग झाल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स, एसटी बस, कंटेनर ट्रक, डंपर व फोर व्हीलर व यामध्ये स्थानिक तालुक्यातील मोटरसायकलचा प्रवास. करणारे प्रवासी सदर रामतीर्थाच्या या धोकादायक वळणावर फणस विक्रीते बसलेत यांना नगरपंचायत किमान वळण सोडून पुढे बसा किंवा जागा बदला अशी सूचना देखील देत नाहीत. परंतु अनेक स्थानिक रहिवासी रहिवाशांच्या तक्रारी येत आहेत. की या ठिकाणी फणस घेण्यासाठी थांबलेली वाहने व या वळणावरून जाणारी वाहने यांचा अपघात होऊ शकतो पुढील अनर्थ टाळावा यासाठी फणस विक्रेत्यांना देखील काही नागरिकांनी सूचना दिल्या की हे ठिकाण योग्य नाही. या वळणावरती आपले ग्राहक फोर व्हीलर गाडी घेऊन अथवा टू व्हीलर गाडी घेऊन फणस घेण्यासाठी थांबलेले असते यामध्ये भरधाव वेगाने येणारी गडहिंग्लज वरुन व आजरा शहरातून वहाने येतात त्यांचा अपघात होऊ शकतो. किंवा एखादे वाहन आपण बसलेल्या त्या ठिकाणी देखील येऊ शकते अशा सूचना देऊन देखील सदर फणस विक्रेते आपली जागा बदलण्याच्या मनस्थितीत नाहीत. पोलीस कर्मचारी यांनी सांगावे तर पोलीस कर्मचारी म्हणतात नगरपंचायत सदर फणस विक्रेत्यांची पावती करतात नगरपंचायत अगोदरच त्यांच्याकडून पावती करून घेतता त्यामुळे पावती करून घ्यायची नगरपंचायतने. व सुरक्षेतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची कशासाठी परंतु याबाबत नगरपंचायत कडे चौकशी केली असता सदर फणस विक्रेत्यांची नगरपंचायत पावती करत नसण्याची समजते. फनस विक्रेत्यांना जागा बदलायची. या गोष्टी काही पचनी पडत नाहीत. त्यामुळे किमान फणस विक्रेत्यांनी तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन यापुढेही व आताही अपघाती क्षेत्र असलेले धोकादायक वळण सोडून फणस विक्रीसाठी बसावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.