श्री. वामनराव पै यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार आजरा तालुक्यातील कृष्णकांत निकाडे यांना प्रधान.
मुंबई. ३ प्रतिनिधी : –
जीवन विद्या मिशनतर्फे सद्गुरू श्री. वामनराव पै यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार सोहळा मुंबईत दादर येथील योगी सभागृह येथे १ जून २०२४ रोजी संध्याकाळी संपन्न झाला. या समारंभात श्री. सद्गगुरू श्री. वामनराव पै यांच्या कन्या मालन ताई आणि सुपुत्र व युथ मेंटॉर श्री. प्रल्हाद दादा पै यांच्या हस्ते श्री. सक्षम बानकर, श्री. अविनाश सारंग, श्री. कृष्णकांत निकाडे आदी ज्येष्ठ मान्यवर कार्यकर्त्यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यापैकी कृष्णकांत निकाडे हे कोल्हापूर जिल्ह्यातील व आजरा ता. बेलेवाडी येथील निवासी असून, त्यांची कारकीर्द मुंबईत घडली आहे. या सोहळ्यासाठी श्री. यश प्रल्हाद पै आणि चि. निखिल यश पै यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे कुटुंबीयही स्टेजवर उपस्थित होते. सद्गुरु श्री. वामनराव पै यांच्या कार्याशी जोडले जाऊन, त्यांचे संकल्पसिद्धीस नेण्यात सहकार्य करणाऱ्या हजारो लोकांमध्ये अनेकानेक पिढ्या कार्य करत आहेत. अनेक दशके जीवन विद्येशी जोडल्या गेलेल्या ठरावीक मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. वर्षभरात गुरुपौर्णिमा, ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण, सद्गुरू श्री. वामनराव पै पुण्यस्मरण या निमित्ताने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते.
कोल्हापूर जिल्ह्यातील बेलेवाडी गावी जन्मलेले श्री. कृष्णकांत निकाडे वडिलांच्या नोकरीनिमित्ताने गिरणगावात आले आणि येथेच शिक्षण घेऊन अर्थाजन करू लागले. १९८४ साली अनुग्रह घेतल्यानंतर, श्री. निकाडे यांनी पुढील ४० वर्षे सद्गुरू कार्याला वाहून घेतले. सर्वमताने १९८५-८६ सालच्या आसपास नाम संप्रदाय मंडळाच्या परळ शाखेची स्थापना करण्याचा निर्णय झाला आणि सेक्रेटरी पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. इथे सद्गुरुंच्या कार्याचा प्रचार प्रसार सुरू झाला. श्री. निकाडे यांचे काम आणि उत्साह पाहून आशादीप ढगे यांनी जीवन विद्या मिशनच्या मुख्य शाखेत विश्वस्त म्हणून शामिल करून घेण्यास त्यांची शिफारस केली. सुरुवातीला विश्वस्त म्हणून काम पहिल्या नंतर वर्ष 1989 ते 1991 दरम्यान त्यांनी मिशनच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पडली. १९८९ साली मी परळ येथून डोंबिवली येथे वास्तव्यास गेल्याने त्यानंतर काही काळाने श्री. निकाडे यांनी आपले कार्य सहकारी श्री. बन्सीधर राणे आणि डॉ. जोग यांच्या सहकार्याने डोंबिवली शाखेच्या स्थापनेने सुरूच ठेवले. आज ३३ वर्षानंतर देखील डोंबिवली शाखा जीवन विद्या मिशनचे कार्य वृद्धिंगत करण्यास हातभार लावत आहे, यादरम्यान श्री. निकाडे अद्याप वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीही क्षमतेप्रमाणे तरुण पिढीस प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न करत आहेत. श्री. निकाडे यांच्या बरोबरीनेच त्यांच्या पत्नी व नामधारक सौ. कविता कृष्णकांत निकाडे, तसेच त्यांचे दोन्ही चिरंजीव मिलिंद आणि निलेश निकाडे आणि त्यांचे परिवार सद्गुरुंच्या या कार्यात नियमित सहभागी होत असतात.
जीवन विद्येचा मानाचा समजला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार स्वीकारताना, श्री. निकाडे अत्यंत भावानावश झाले होते. यावेळेस त्यांनी सद्गुरूंचेच स्मरण करून नवीन पिढीला स्वत्व आणि सहकार्याचे धडे घेत कार्यात झोकून देण्याची विनंती केली आहे.
