नागरिकांच्या मदतीने.- चंदगड तालुक्यातील वेटरचे काम करणाऱ्या रुग्णाला केलेली आर्थिक मदत.
【सुमारे सव्वा दोन लाखापर्यंत असा हा खर्च आजरा शहरातील मुस्लिम युवकांनी.- चंदगड तालुक्यातील रुग्णासाठी मदत स्वरुपात जमा केली. 】
आजरा. प्रतिनिधी. ११
आजरा येथील शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये
चंदगड तालुक्यातील गवसे येथील एक गरीब कुटुंबातील युवक जो सध्या आजरा येथे एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. त्याची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती या रुग्णाला सर्दी ताप खोकला सुरू झाला आणि त्यातून त्याची ऑक्सिजनची पातळी खूपच खाली घसरली ४१ स्कोअर पर्यंत झाली अशावेळी शासकीय कोविंड सेंटर आजरा येथे सदर रुग्णावर उपचार उपचार करत असताना ऑक्सिजनच्या ऐवजी त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. पण आजरा कोविंड सेंटरने जंबो सिलेंडर जोडून तात्पुरते ऑक्सिजनची सोय केली मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून यासंदर्भातले पैसे जमा करण्याचा त्यांनी चंग बांधला सदर पेशंटची स्थिती दिवसेंदिवस सुधारत गेली आणि ज्या दिवशी ऍडमिट केलं होतं त्या दिवसानंतर आठव्या दिवशी हा पेशंट पूर्णपणे बरा झाला आजरा शहरातील बांधकाम कामगारांनी व तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी हे पैसे मदतीच्या स्वरूपात जमा केले आणि त्या युवकाला एक नवीन जीवन दिलं या कोरोणा महामारीच्या काळात एकतर वेंटिलेटर मिळणे अवघड तर व्हेंटिलेटर मिळालं खाजगीला मिळालं तर पैशाची तयारी कोणाचीही नसेल तर गरिबाच्या नशिबात मृत्यू शिवाय काही नसणार पण या सर्व जिद्दी युवकांनी एकत्र येऊन हा एक नवा पायडा घालून दिलेला आहे सुमारे सव्वा दोन लाखापर्यंत असा हा खर्च आजरा शहरातील युवकांनी व चंदगड तालुक्यातील पेशंटच्या नातेवाईकांनी एकत्र करून सदर रुग्णाचं बिल भागवले रुग्णाची स्थिती आता अत्यंत चांगली आहे. मृत्यूच्या दारातून लोकांच्या मदती मदतीतून एक जीव वाचवल याच समाधान त्यानिमित्ताने सर्वांनी अनुभवलं तर दुसऱ्या तालुक्यातील रुग्णाला देखील आजरा तालुक्यातील नागरिकांनी एक आदर्श घालून दिला. या केलेल्या मदतीबाबत नागरिकांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
