Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रव्यंकटराव हायस्कूलचे सुवर्ण यश. ( आजरा तालुक्यात प्रथम, द्वितीय व केंद्रात पाचवा...

व्यंकटराव हायस्कूलचे सुवर्ण यश. ( आजरा तालुक्यात प्रथम, द्वितीय व केंद्रात पाचवा क्रमांक मिळवत व्यंकटरावचे विद्यार्थी यशस्वी.)🛑 निवडणूक संपताच अजित पवारांना मोठा दणका – ईडीने नाव वगळलेल्या जरंडेश्वेर साखर कारखान्याच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू👇

🛑व्यंकटराव हायस्कूलचे सुवर्ण यश. ( आजरा तालुक्यात प्रथम, द्वितीय व केंद्रात पाचवा क्रमांक मिळवत व्यंकटरावचे विद्यार्थी यशस्वी.)
🛑 निवडणूक संपताच अजित पवारांना मोठा दणका – ईडीने नाव वगळलेल्या जरंडेश्वेर साखर कारखान्याच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू👇

आजरा :- प्रतिनिधी

आजरा येथील आजरा महाल शिक्षण मंडळ संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी एस .एस. सी. परीक्षा २०२४ मध्ये आजरा तालुक्यात प्रथम, द्वितीय व केंद्रात पाचवा येण्याचा मान मिळवला…
प्रशालेतून एस एस सी परीक्षा २०२४ साठी १९९ विद्यार्थी प्रविष्ट झाले पैकी १९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.. शाळेचा ९८.९९% निकाल लागला.. कुमारी खवरे कादंबरी जयदीप (सुलगाव ) ९८.४०% गुण मिळवून हिने आजरा तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. कु.नवार राखी राजू (गवसे) ९७.४०% आजरा तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला., कु.येरुडकर मेघा श्रीधर (पेरणोली) ९५.६०% केंद्रात पाचवी, कुमार.पाटील आदित्यराज दीपक (गडहिंग्लज ) ९४.८०% शाळेत चौथा, कुमारी शिवणे समृद्धी सुरेश (नावलकरवाडी) ९३.८०% गुण मिळवून शाळेत पाचवा येण्याचा मान मिळवला. ९०% च्या वर गुण मिळवत शाळेतून अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य आर. जी .कुंभार,पर्यवेक्षिका.सौ.व्ही.जेशेलार तसेच सर्व पालक मंडळी यांचे प्रोत्साहन लाभले. सर्व वर्गशिक्षक व विषय शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

🛑 निवडणूक संपताच अजित पवारांना मोठा दणका – ईडीने नाव वगळलेल्या जरंडेश्वेर साखर कारखान्याच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू
( जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने अजित पवारांच्या मागे ससेमिरा? )

मुंबई :- प्रतिनिधी.

Oplus_131072

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात अँटि करप्शन ब्युरोकडून ही चौकशी सुरु करण्यात आली आहे.त्यामुळं अजित पवारांच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे.
🔴ईडीकडून जरंडेश्वर कारखान्याची चौकशी बंद केली होती. पण आता एसीबीकडून पुन्हा ही चौकशी सुरु केली आहे. ईडीनं काही महिन्यांपूर्वी जरंडेश्वर कारखान्यासंबंधी कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं त्यामध्ये अजित पवारांचं नाव वगळून त्यांना क्लीनचीट दिली होती.आता लोकसभेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील मतदान संपले आहे. हे मतदान संपते ना संपते तेच अजित पवार यांना एक मोठा धक्का बसला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित जरंडेश्वेर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू केली गेली आहे.
🟥राज्याच्या ⁠लाचलुचपत विभाग अर्थात एसीबीकडून ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती समजली आहे. साताऱ्यातील अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यावहार, कोरेगाव येथील एक भूखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात आता ही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. ही चौकशी पुन्हा सुरु होणे म्हणजे अजित पवारांसाठी हा धक्का मानला जातोय.
🛑जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु होणे म्हणजे महायुतीत सर्व आलबेल नाही अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत. अजित पवार हे भाजप-शिवसेनेसोबत महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळाले होते.जरंडेश्वर कारखान्याची ईडीने चौकशी केल्यानंतर चार्जशीट दाखल केले. यामधून त्यातून अजित पवार यांचे नाव वगळले होते. परंतु आता पुन्हा एसीबीने चौकशी सुरू केली असल्याने मोठा धक्का पवार यांना बसल्याचे सांगण्यात येत आहे.

🟥काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण:-

जरंडेश्वर साखर कारखाना तत्कालीन आमदार शालिनीताई पाटील चालवत होते. त्यावेळी कर्जात बुडालेला हा कारखाना वाचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. यात त्यांना यश आले नाही. अखेर हा कारखाना लिलाव प्रक्रियेत गेला त्याचाच लिलाव झाला व हा कारखाना गुरु कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकत घेतला.अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीने हा कारखाना घेतल्याचा आरोप केला जातोय. शालिनीताई पाटील यांनी ही लिलाव प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप केला आहे.
🟥दरम्यान,अजित पवार सध्या सत्तेत असून उपमुख्यमंत्री आहेत. पण तरीही राज्याच्या गृहविभागाकडून एसीबीमार्फत चौकशी सुरु केली आहे. यासंदर्भातील एक अधिकृत पत्र समोर आलं आहे. यामध्ये जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्यातील तसेच या कारखान्याचा कोरेगावमधील एक भूखंड आणि लक्ष्मी ऑरगॅनिक डिस्टलरिज संबंधीची ही चौकशी आहे.
🔴लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा १३ मे रोजी संपला त्यानंतर १७ मे पासून या चौकशीला सुरुवात झाली. जरंडेश्वर प्रकरणी ईडीनं अजित पवारांना क्लीनचीट दिल्यानं तसंच इन्कम टॅक्स विभागानं देखील याप्रकरणी अजित पवार आणि कुटुंबियांना क्लीनचीट दिली होती. त्यामुळं आता अजित पवारांसाठी हे प्रकरण संपल्याचं म्हटलं जात होतं. पण आता पुन्हा याची एसीबीकडून चौकशी सुरु झाल्यानं नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.