Homeकोंकण - ठाणेगाव करेल ते राव काय करणार!- मतदानावर 'मेहुणे'चा बहिष्कार अन् गावकरी मतदान...

गाव करेल ते राव काय करणार!- मतदानावर ‘मेहुणे’चा बहिष्कार अन् गावकरी मतदान केंद्राकडे फिरकलेच नाहीत.🛑पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर.- आरोपीने दारु पिऊन गाडी चालवल्याचं स्पष्ट. – जामिनाविरोधात पुणे पोलीस सत्र न्यायालयात🛑पुणे अपघातात आरोपीने नशेतच पोर्शे कार चालवल्याचं स्पष्ट!

🟥गाव करेल ते राव काय करणार!- मतदानावर ‘मेहुणे’चा बहिष्कार अन् गावकरी मतदान केंद्राकडे फिरकलेच नाहीत.
🛑पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर.- आरोपीने दारु पिऊन गाडी चालवल्याचं स्पष्ट. – जामिनाविरोधात पुणे पोलीस सत्र न्यायालयात
🛑पुणे अपघातात आरोपीने नशेतच पोर्शे कार चालवल्याचं स्पष्ट!

नाशिक :- प्रतिनिधी.

निवडणुका जवळ आल्यावर अनेक ग्रामस्थ त्यांच्या मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं जाहीर करतात, पण नंतर राजकारण्यांकडून त्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन मिळाल्यानंतर मात्र तो बहिष्कार मागे घेतात.मात्र दिंडोरी मतदारसंघातील एका गावाने मात्र मतदानावर टाकलेला बहिष्कार कायम ठेवला. गावातील पाणीटंचाई, पेयजल योजना, शेती आदी प्रश्नांनी त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी एकमताने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला अन् त्या निर्णयावर ठाम राहून एकाही ग्रामस्थाने मतदान केले नाही.

🔴’गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील मेहुणे या गावात आला. गावातील पाणीटंचाई, पेयजल योजना, शेती आदी प्रश्नांनी त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी एकमताने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयावर ठाम राहून एकाही ग्रामस्थाने मतदान केले नाही.

🟥गावात शून्य टक्के मतदान

मेहुणे गावातील तीन मतदान केंद्रावर 2,757 मतदान होते. मात्र गावाने ठरवलेल्या निर्णयाला विरोध कोण करणार म्हणून एकही ग्रामस्थ मतदानाला गेला नाही. त्यामुळे या गावात शून्य टक्के मतदान कागदावर नोंदवून मतदान यंत्रणेला माघारी फिरावे लागले.
काय आहेत गावकऱ्यांच्या मागण्या?
🔺मेहुणे गावातील बंद पडलेली 56 खेडी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात यावी, झाडी धरणाचे काम पूर्ण करावे, गावात सध्या दोन पाणी टँकरने पुरवठा केला जातो, तो अपूर्ण पडत असल्यामुळे पाणी टँकरची संख्या वाढवावी यासह विविध मागणी ग्रामस्थांनी केली होती. या सर्व प्रश्नांना गावकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याने गावातील ग्रामस्थ हे त्रस्त होते. त्यामुळे गावकऱ्यांनी एकमताने लोकसभा निवडणुकीत मतदान करायचे नाही असा निर्णय घेतला.
🔺याबाबत ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेला पूर्वकल्पना देखील दिलेली होती. मात्र संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी हे टोकाचे पाऊल उचलावे लागले. अपर जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस आदी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एकाही मतदाराने मतदान केले नाही. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या मतदान प्रक्रियेत मेहुणे गावाला सहभाग घेता आले नाही याचे दुःख आहे, मात्र गावातील समस्या या त्यापेक्षाही महत्त्वाच्या आहेत अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
🔺एक महिना आधीच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतरही शासकीय यंत्रणेने या गावची दखल घेतली नाही. त्यामुळे भविष्यात तरी मेहुणे गावातील ग्रामस्थांची दखल घेतली जाईल का ? हा खरा प्रश्न आहे.

🛑पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर.- आरोपीने दारु पिऊन गाडी चालवल्याचं स्पष्ट. – जामिनाविरोधात पुणे पोलीस सत्र न्यायालयात

पुणे :- प्रतिनिधी.

बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना चिरडणारा पुण्यातील अल्पवयीन बिल्डरपुत्र वेदांत अगरवालला अवघ्या 15 तासात जामीन मिळाल्याने संतापाची लाट उसळली आहे.दोघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या वेदांत अगरवालला जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यचकारक असल्यानेही भूवया उंचावल्या आहेत.सर्वच स्तरातून सडकून टीकेचा मारा सुरु झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील सादर केला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली.

🛑पुणे अपघातात आरोपीने नशेतच पोर्शे कार चालवल्याचं स्पष्ट!

पुण्यात झालेल्या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा (रा. मध्य प्रदेश) नावाच्या तरुण तरुणीला चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आता पोलिसांनी सुद्धा वेदांत अगरवालने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवल्याचे स्पष्ट असल्याचे सांगितले. अमितेश कुमार म्हणाले की, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पब मारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी अबकारी विभागासासोबत काम करण्यात येईल.
🔴अमितेश कुमार यांनी सांगितले की, कोणालाही वाचवण्यात येणार नाही. विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का आहे का? यातून समजेल. ते म्हणाले की, या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हा मुलगा खरंच अल्पवयीन आहे का? याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत आहे. हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे.
🅾️बिल्डराने आपल्या पोरासाठी मध्यरात्रीच ‘बळाचा’ वापर करत आपला मुलगा कार चालवत नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ड्रायव्हरला त्याठिकाणी उभा केला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शीनी केलेल्या धुलाईने आणि दिलेल्या माहितीने भांडाफोड झाला होता.
🛑तसेच पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलताना पुढे म्हणाले की,कल्याणीनगरमध्ये रविवारी पहाटे झालेल्या अपघातात इंजिनिअर तरुण तरुणीचा मृत्यू झाला.अल्पवयीन मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील, हॉटेलचे मॅनेजर आणि त्याला दारु पुरवणाऱ्यांसह पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर, दोन हॉटेल चालकांवर मिळून तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, “पुणे पोलिसांनी गांभीर्याने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ३०४ अंतर्गत कलम लावले आहेत. हा आरोपी अल्पवयीन आहे त्यामुळे त्याला निरीक्षणगृहात ठेवण्यासाठी मागणी केली होती. मात्र, आमची मागणी फेटाळली आहे. या विरोधात आम्ही सत्र न्यायालयात अपील करणार आहोत.”
वडिलांनी दिली गाडी.- दारु प्यायलाही परवानगी

पालकांनी एवढी महागडी गाडी दिली,त्याला दारू पिण्यास परवानगी दिली म्हणून त्याच्या विरोधात पण गुन्हा दाखल केला आहे. वडील आणि मॅनेजर याच्या विरोधात वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही कसूर सोडली नसून कायद्यानुसार सर्व प्रकिया पूर्ण करण्यात आलीय. एसीपी दर्जा अधिकारी या केसचा तपास करत आहे. आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असल्याचंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.

🛑दारु पीत असल्याचं फूटेज

पब आणि बार याच्या वेळेची आम्ही अंमलबजाणीबाबत काम करत आहोत. अनेक सुधारण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अधिकाऱ्यांसोबत सोबत बैठक झाली आहे. ट्रॅफिक, ड्रिंक अंड ड्राईव्ह बाबत सगळी चर्चा झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत पण चर्चा सुरू आहे. एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास सोपवला आहे. आरोपीला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू. आरोपीने दारू प्यायली होती, दारु पिताना सीसीटीव्ही फूटेज मिळालं. पुरावे आमच्याकडे आहेत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

पब आणि बारवर कारवाई होणार?

अपघाताचा तपास गुन्हे शाखेकडे पाठवला आहे. सीसीटीव्ही फूटेज गोळा केलं असून तपास केला जात आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही असं नाही, पोलिसांना जे कायदेशीर अधिकार आहेत त्यानुसार कारवाई केली जात आहे. कल्याणीनगर परिसर आणि पुण्यात जे पबचे नियम आहेत. रात्री उशिरापर्यंत चालू राहतात त्याबद्दल अनेकदा कारवाई झालीय. पबच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी, कमी वयाच्या मुलांना मद्य पुरवठा करण्याच्या मुद्द्यांवर आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि संबंधित विभागांसोबत चर्चा झालीय. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

🟥राजकीय हस्तक्षेप नाही

अपघातानंतर बिल्डरचा मुलगा असल्याने या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता पोलीस आयुक्तांनी असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, पोलिसांनी कायद्यानुसार काम केलं. मी स्पष्ट सांगेन की पोलिसांकडे जे अधिकार होते त्याचा वापर केला. कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, दबावाच पोलिसांनी काम केलं नाही यासाठी पब्लिक डिबेटला तयार आहे. कोणताच दबाव नाही, हस्तक्षेप नव्हता असंही सांगितलं.

🔴गाडी कुणाच्या नावावर‌- डीलरवर कारवाई होणार?

गाडीला नंबर प्लेट नव्हती, कोणी विकली आणि विना नंबर प्लेटची शोरूममधून कशी बाहेर आली? कधीपर्यंत टेम्पररी नंबर प्लेट होती? नंबर प्लेट असेल तर मग नंबर प्लेटशिवाय कशी चालवली? याचा तपास केला जात आहे. गाडी त्याच्या वडिलांच्या नावावर होती अशी माहिती पोलिस आयुक्तानी दिली.

🟥पुण्यात एका तरुण – तरुणीचा बळी घेणाऱ्या पोर्श कार टायकनची एक्स-शोरूम किंमत 1.61 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 2.44 कोटी रुपयांपर्यंत जाते.
🟣पोर्श वाहनांची गणना लक्झरी कारमध्ये केली जाते. पोर्श कार तुम्हाला प्रवास करताना आराम देते. या कारचा नुकताच मोठा अपघात झाल्याने ही कार चर्चेत आली आहे.रात्री पुण्यात हा अपघात झाला.भरधाव वेगाने जाणाऱ्या एका पोर्श कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.तर शहर डीसीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्श कारचालवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये हा अपघात झाला.
🟥कार चालक पोर्श टायकन २०० च्या सुसाट वेगाने चालवत होता, त्यामुळे दुचाकी समोरून आदळली. या धडकेमुळे दुचाकी चालकाचा तोल गेला आणि दुचाकीस्वार व त्याच्यासोबत असलेली तरुणी यांचे निधन झाले. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. ज्या आलिशान कारमुळे हा अपघात झाला त्याची किंमत काय आहे? ते जाणून घेऊया.

🔴पोर्श टायकनची वैशिष्ट्ये

पोर्श टायकनमध्ये मॅट्रिक्स डिझाइन एलईडी हेडलाइट्स आहेत. तर टर्बो मॉडेल्समध्ये मानक एचडी-मॅट्रिक्स डिझाइन एलईडी हेडलाइट्स बसवण्यात आले आहेत. कारमध्ये 360-डिग्री व्ह्यू कॅमेराची सुविधा देखील आहे. पोर्शच्या कारमध्ये 10.9-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो नेव्हिगेशन सिस्टम आणि इन्फोटेनमेंट सिस्टम वैशिष्ट्ये प्रदान करतो.

🔴पोर्श टायकनची पावर

पोर्श टायकन ही उत्तम वैशिष्ट्ये असलेली कार आहे. ही कार 300 kW किंवा 408 PS ची पॉवर जनरेट करते. पोर्श कारचा टॉप स्पीड 230 kmph आहे. तर ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी 4.8 सेकंद घेते.

🛑या वर्षी मार्चमध्ये पोर्श टायकनचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात दाखल झाले होते. Porsche Taycan Turbo GT ही एक शक्तिशाली आणि वेगवान कार आहे. ही कार केवळ 2.1 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. जर्मन कार निर्मात्याचा दावा आहे की ही कार 305 किमी प्रतितास इतका वेग देते.

🔴पोर्श टायकन किंमत.

पोर्श कार लोकांना आलिशान अनुभव देतात. या कारच्या पॉवर आणि फीचर्समुळे या कारची किंमत करोडो रुपयांच्या घरात जाते. पोर्श टायकनची एक्स-शोरूम किंमत 1.61 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 2.44 कोटी रुपयांपर्यंत जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.