Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा बस स्थानकावरील कचरा साफसफाई बाबत - आजरा रहिवासी यांचे निवेदन.🛑प्रतिभा शिंदे...

आजरा बस स्थानकावरील कचरा साफसफाई बाबत – आजरा रहिवासी यांचे निवेदन.🛑प्रतिभा शिंदे यांना लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार – ८ जूनला भारत पाटणकर यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान.‌

🛑आजरा बस स्थानकावरील कचरा साफसफाई बाबत – आजरा रहिवासी यांचे निवेदन.
🛑प्रतिभा शिंदे यांना लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार – ८ जूनला भारत पाटणकर यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान.‌

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा येथील बस स्थानकावरील अस्वच्छता बाबत अन्याय निवारण समितीकडून निवेदनातून मागणी केल्या आहेत. त्यामध्ये
१) आजरा येथील रिझव्हेंशन व्यवस्था बंद केली आहे. तरी ती त्वरीत चालु करणेबाबत आपले स्तरावर काय कार्यवाही झाली. सदर रिझव्हेंशन व्यवस्था त्वरीत चालु करणेत यावी.
२) बस स्थानक येथील कचरा सफाई व उचलणे बाबत जो ठेकेदार नेमनेत आला आहे त्याच्याकडून कामाची अंमलबजावणी होते किंवा नाही. नसलेस त्यांचेवर काय कार्यवाही केली ते कळावे,
३) बस स्थानक आवारात चकोते बेकरीचे दुकान घालणेची आपलेकडून सदर परवानगी कोणत्या अटीवर दिली आहे त्याचा करारनाम्याची कॉपी आम्हाला मिळावी व त्यावर सविस्तर चर्चा करणेत यावी.
४) कोल्हापूर मार्गावर आजरा येथून सोडणेत येणाऱ्या बसेस व कोल्हापूर येथून आजराकडे येणाऱ्या बसेस विषयी आपणाशी दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी चर्चा करणेत आली होती. त्यावेळी आपणाकडील कर्मचारी श्री जोशी रजेवर असलेमुळे दि. २९ एप्रिल २०२४ रोजी आपल्या व्हाट्सअप वर याची माहिती पाठवितो असे सांगितले होते त्याबाबत अजुनही काहीही कार्यवाही झालेली नाही.
वरील सर्व बाबींची पूर्तता करून कचरा उचलणे व रिझव्हेंशन पूर्ववत चालु करणे विषयी त्वरीत कार्यवाही होणे बाबत अन्याय निवारण समिती यांनी निवेदनातून विनंती केली आहे. या निवेदनावर
परशुराम बामणे (भाऊजी) अध्यक्ष, संदिप पारळे सचिव.
पांडुरंग सावरतकर सेक्रेटरी सुजित देसाई, श्री.चव्हाण, गौरव देशपांडे, संजय जोशी, विक्रांत वाळके, सामाजिक कार्यकर्ते सलीम लतीफ यावेळी उपस्थित होते.

🛑प्रतिभा शिंदे यांना लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार – ८ जूनला भारत पाटणकर यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान.‌

आजरा – प्रतिनिधी.

यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार ८ जून रोजी प्रतिभा शिंदे यांना डॉ भारत पाटणकर यांच्या हस्ते प्रदान करण्याचा निर्णय आज आजरा येथे झालेल्या पुरस्कार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव शिंपी होते. समितीचे कार्यध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी मागील बैठकीचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीमुळे आपला कार्यक्रम लांबला होता. त्यामुळे हा कार्यक्रम जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात घ्यावा असा प्रस्ताव मांडला. यावेळी ज्यांना पुरस्कार द्यायचा आहे त्या प्रतिभा शिंदे आणि ज्यांच्या हस्ते द्यायचा आहे ते डॉ भारत पाटणकर यांच्याशी संपर्क करून सर्वांच्या सोयीची म्हणजे ८ जून ही तारीख निश्चित करण्यात आली. प्रतिभा शिंदे या धुळे नंदुरबार परिसरातील आदिवासी, शेतकऱ्यांच्या लढाऊ नेत्या आहेत.

नर्मदा प्रकल्पातील पुनर्वसनाची लढाई त्या नेटाने लढवत आहे. एक लढाऊ आणि झुंजार कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. डॉ भारत पाटणकर हे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेचे लढाऊ नेते आहेत. गेली चाळीस पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्र्रात दलित, आदिवासी, शेतकरी यांचे अनेक यशस्वी लढे उभे केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील समन्यायी पाणी वाटपाच्या चळवळीने संपूर्ण देशात एक नवा आदर्श घालून दिला आहे. ते सामाजिक चळवळीतील लढाऊ नेते आहेतच पण त्याचबरोबर एक जेष्ठ विचारवंत म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. यावर्षीचा हा कार्यक्रम श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे ८ जून रोजी ठीक ११.३० वाजता होणार आहे. या बैठकीला मुकुंददादा देसाई, अल्बर्ट डिसोझा, डॉ नवनाथ शिंदे, प्रा मीना शिरगुप्पे, पुष्पलता घोळसे, रवी भाटले, रणजित कालेकर, काशिनाथ मोरे, धनाजी राणे, कृष्णा सावंत यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. आभार समितीचे सचिव सुनील पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.