Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपारंपारिक वाद्याच्या गजरात वेशभूषात - आजऱ्यात शिवजयंती उत्साहात.- संयुक्त शिवजयंती व वाघाची...

पारंपारिक वाद्याच्या गजरात वेशभूषात – आजऱ्यात शिवजयंती उत्साहात.- संयुक्त शिवजयंती व वाघाची तालीम मंडळाकडून शिवजयंती साजरी

पारंपारिक वाद्याच्या गजरात वेशभूषात – आजऱ्यात शिवजयंती उत्साहात.- संयुक्त शिवजयंती व वाघाची तालीम मंडळाकडून शिवजयंती साजरी

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरात परंपरेनुसार होणाऱ्या शिवजयंतीचे आयोजन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले होते. गेली कित्येक वर्षे आजरा शहरात शिवजयंती ही अत्यंत उत्साहात साजरी होते दरवर्षी सुमारे २५ हून अधिक मंडळे या पारंपरिक शिवजयंतीत एकत्र होऊन सहभागी असतात. यंदाच्या वर्षी सदर शिवजयंती ही वैशाख शु.द्वितीया,शके १९४६,गुरुवार दि.०९ मे २०२४ रोजी होत असून यानिमित्ताने पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार वैशाख शु.प्रतिपदा दि.०८ मे रोजी सकाळी ११:०० वाजता छ.शिवरायांच्या मूर्तीवर घातल्या जाणाऱ्या अभिषेकासाठी हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे पवित्र जल आणले जाणार आहे. गुरुवार वैशाख शु. द्वितीया, ०९ मे ( शिवजयंती दिनी ) सकाळी ७:०० वाजता शिवरायांच्या अर्धाकृती मूर्तीस महाभिषेक करण्यात येणार असून सकाळी १०:०० वाजता पाळणा झाला. तर गुरुवारी ९ रोजी सायंकाळी शिवजयंती निमित्त भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये लेझीम, सजीव देखावे, हलगी, घोडे, लहान मुलांची शिवकालीन वेशभूषा, लाईटशो ज्या १५ वर्षाखालील लहान मुलांना शिवकालीन वेशभूषेत सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी खालील क्रमांकाच्या व्हाट्सएप नंबरवर सहभाग नोंदवायचा सूचना देण्यात आल्या होत्या ‌ सदर मिरवणूक ही सायंकाळी ४:३० वाजता व्यंकटराव हायस्कुल पासून सुरू झाली.

Oplus_131072


आजरा येथे पारंपारिक व तिथी नुसार शिवजयंती साजरी केली जाते यामध्ये आजरा संयुक्त शिवजयंती मिरवणूक व्यंकटराव हायस्कूल आजरा येथील सुरुवात झाली. प्रतिमेचे पूजन नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी केले यावेळी मंडळ अधिकारी श्री पाटील, विनोद पांडव तसेच प्रमुख उपस्थिती आनंदा कुंभार, प्रभाकर कोरवी, नाथ देसाई, सुधीर कुंभार, गौरव देशपांडे, उदय चव्हाण, बाळ केसरकर, संभाजी पाटील, शुभम पाटील, संदीप पारळे सह शिवजयंती उत्साहात शिवभक्त सहभागी झाले होते. शिवजयंती मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळ प्रात्यक्षिके करण्यात आली तर सजीव देखावे, लेझीम, पारंपारिक हलगी वादन यामुळे मिरवणूकला रंगत आली. डॉल्बी मुक्त मिरवणूक काढण्यात आली.

Oplus_131072

आजरा शहरात
वाघाची तालीम मंडळाची देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक संभाजी महाराज चौक येथून सुरुवात झाली या शिवछत्रपती यांचे प्रतिमीचे पुजन व पुष्पहार घालून पूजन करून श्रीफळ वाढवून प्रभाकर कोरवी, योगेश पाटील तसेच संस्थापक अध्यक्ष शैलेश पाटील, राहुल नाईक, अक्षय नलावडे, मारुती बिरजे या प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.
आजरा शहरातील दोन्ही शिवछत्रपती महाराजांच्या मिरवणूक शांततेत पार पडल्या
वाघाच्या तालमच्या शिवजयंती उत्साहात संतोष गिरी, राहुल नाईक, मंदार बिरजे, अमर पाटील, निलेश पालपोलकर, अभिषेक रोडगे, ऋत्विक बिरजे, मुरुड बंधू सतोनो पाटील सह आजरा शहरातील नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येने शिवजयंती मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.