Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रराजकीय नेत्यांना भुरळ पाडणारा महंतच निघाला खुनी.- मठात शिष्याची हत्या केल्यानंतर फरार(...

राजकीय नेत्यांना भुरळ पाडणारा महंतच निघाला खुनी.- मठात शिष्याची हत्या केल्यानंतर फरार( कोल्हापूर येथील मठामध्ये सेवेकरी होत्या. मयत )🛑यशवंतराव चव्हाण यांची निती व आजची राजकीय परिस्थिती..

🛑राजकीय नेत्यांना भुरळ पाडणारा महंतच निघाला खुनी.- मठात शिष्याची हत्या केल्यानंतर फरार
( कोल्हापूर येथील मठामध्ये सेवेकरी होत्या. मयत )
🛑यशवंतराव चव्हाण यांची निती व आजची राजकीय परिस्थिती..

अहमदनगर :- प्रतिनिधी.

जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरांमध्ये गेल्या नवरात्र उत्सवाला छातीवर घटाची स्थापना करणाऱ्या एका महंतांची चांगली चर्चा राज्यभर रंगली होती. विशेष म्हणजे अनेक नेत्यांनी या महंताचे दर्शन घेण्यासाठी रांगा देखील लावल्या होत्या.मात्र स्वतःला महंत म्हणून घेणारा हा ढोंगी आपल्याच एका शिष्याच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी ठरला आहे. सध्या तो फरार झाला आहे. बालयोगी महेश्वरानंद असं या महंताचे नाव आहे. महेश अर्जुन माने हे मूळ नाव आहे.
🛑श्रीरामपूर येथे गेल्या वर्षी छातीवरती घटस्थापन करणाऱ्या या बाबाचे शहरभर फ्लेक्स लागले होते. नवरात्रोत्सव काळामध्ये बाबाने तब्बल महिनाभर श्रीरामपूरमध्ये वास्तव्य देखील केले. नेते लोकप्रतिनिधी बाबांच्या चरणी लीन झाले होते. मात्र महंत म्हणून घेणाऱ्या या बाबावर एका खुनाचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळं या ढोंगी बाबाचा खरा चेहरा हा उघड झाला आहे.
🔴याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूरमध्येच राहणाऱ्या ३४ वर्षीय वैष्णवी लक्ष्मीकांत पवार या महाराजांच्या कोल्हापूर येथील मठामध्ये सेवेकरी होत्या. मयत वैष्णवीचा एका तरुणाशी विवाह जुळवण्यामध्ये या बाबाचा पुढाकार होता. मात्र लग्नापूर्वी वैष्णवी व तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लिव्ह इन मध्ये राहण्याचा आग्रह धरला होता. त्याला वैष्णवीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. वैष्णवीने धरलेला हट्ट सोडावा यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तिला महंताकडे नेले. मात्र तरीदेखील मुलीने नकार दिल्याने तिला मठांमध्येच मारहाण करण्यात आली आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सेवेकरी, आई व वडील यांनी महंतांच्या सांगण्यावरूनच मारहाण केल्याचा आरोप आहे.याच महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर महंतच या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे पोलिसांनी समोर आणले. गुन्हा दाखल होताच हा ढोंगी तेथून पसार झाला आहे. बाबा म्हणून डोक्यावरती बसवले ढोंगी हा एका मुलीचा खुनी निघाल्याचे बातमी समजतात श्रीरामपूर तालुक्यासह नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे जे लोकप्रतिनिधी तसेच पुढारी या बाबाच्या चरणी लीन झाले आता त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे.
🟥दरम्यान, या बाबाचे पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे मठ आहे. त्याचाच भाऊ बालकृष्ण महाराज यांच्यासह तो स्वतः या मठाचे काम पाहतो. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, सोलापूर पनवेल, सांगलीसह उस्मानाबादमध्ये याचा मोठा भक्त परिवार देखील आहे.

🛑यशवंतराव चव्हाण यांची निती व आजची राजकीय परिस्थिती..

सातारा जिल्ह्यातील इतिहासात सर्वात मोठा घमासान झाला तो शालिनीताई आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात. साक्षात इंदिरा गांधींनी या जिल्ह्यात यशवंतरावांच्या विरोधात प्रचंड ताकद लावली. हाच तो काळ. तेव्हा शालिनीताईंनी केलेलं एक विधान महाराष्ट्रभर गाजलं आणि आजही जाणकारांना ते ठसठसतं आहे. शालिनीताईंचा आरोप होता, की ‘ज्याला घरचा पाळणा हलवता आला नाही, तो समाजवादाचा पाळणा काय हलवणार?’
या विधानावरून अख्ख्या महाराष्ट्रात काहूर माजलं.
निवडणुकीचा नूर पालटला होता,
या वाक्याचा प्रतिकार व्हायलाच हवा. असं वातावरण असताना यशवंतराव चव्हाणांच्या व्यासपीठावर एक उमदा तरुण आणि फर्डा वक्ता सभा गाजवत होता. त्याचं नाव प्रतापराव भोसले. शालिनीताईंचा बदला घेण्यासाठी त्याने आपल्या वाईच्या सभेचा लाभ घेतला. आणि त्यांनी स्फोटक विधान केलं. तो तरुण म्हणाला,
‘अनेकांनी लावून लावून, जिचं कुंकू मोठ्ठं झालंय, तिने चव्हाण साहेबांवर बोलू नये.’
प्रचंड टाळ्या झाल्या.
सभा प्रचंड गाजली.
शालिनीताईंना त्याच भाषेत उत्तर मिळालं होतं.
सभा संपली.
सगळे व्यासपीठावरून खाली उतरत होते. तेव्हा यशवंतराव चव्हाणसाहेबांनी प्रतापरावला जवळ घेतले. खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले, ‘प्रतापराव काहीही झाले तरी त्या आमच्या वहिनीसमान आहेत. राजकारण होत राहील. पण तुमचं हे बोल आमच्या मनाला लागले. वहिनींचा अपमान आम्हाला खपणार नाही.
म्हणून तुम्ही मतदान होईपर्यंत माझ्या व्यासपीठावर यायचं नाही…!

याला म्हणतात ‘यशवंत नीती’.
2024 च्या निवडणुकीत उमेदवार, प्रचारक आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांना ही यशवंत नीती कळेल?
यशवंत नीती कळणार नसेल,
तर इतकंच करा,
जिभेला लगाम घाला… अज्ञात…. मतदार..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.