मुंबईत पहाटेपासूनचं जोरदार पाऊस सुरू
तर दिवा गावात मुसळधार पावसामुळे पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं.- नागरिक त्रस्त
दिवा. प्रतिनिधी. ०९
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
दुसरीकडे मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, आज पहिल्याच पावसात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे ठप्प झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.एकाबाजूला मुंबईत तुफान पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला मुंबईच्या आजूबाजूच्या शहर गावांमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत असल्याच वृत्त आहे. दिवा गावातील अनेक भागात तेच चित्रं पाहायला मिळत असून पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरल्यानं नागरिक त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. तर पेडर रोडवर पाणीच- पाणी दिसत सर्व रस्ते पाण्याने भरले होते.
