पती व सासर्याला मारहाण सुनेसह तिघा विरुद्ध गुन्हा दाखल.- आजरा सुलगावातील घटना.
आजरा.- प्रतिनिधी.
सुलगांव ता. आजरा येथे पती रवींद्र अशोक कुंभार व सासरे अशोक गोविंद कुंभार यांना दगडाने मारून त्यांचा चावा घेतल्याप्रकरणी सुलगाव येथील सीमा रवींद्र कुंभार यांच्यासह अर्चना कमलेश कुंभार, संजीवनी संभाजी कुंभार (सर्व रा.सुलगाव) यांच्या विरोधात सासरे अशोक गोविंद कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती. माहिती अशी सीमा कुंभार हिचे एका तरुणाशी प्रेम संबंध असल्याचे सासरे अशोक कुंभार व पती रवींद्र कुंभार यांना समजल्याने ते या संबंधातील विचारणा करण्यासाठी संजीवनी कुंभार यांच्याकडे गेले होते. तिथे शाब्दिक वादावादी होऊन त्यानंतर अर्चना व संजीवनी कुंभार यांनी त्यांना गळपट धरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान सीमा कुंभार हिने माझ्या बहिणीशी वाद घालतोस काय ? असे म्हणत अशोक कुंभार यांच्या डोक्यात दगड घातला व त्यांचा चावा घेऊन जखमी केले. अशोक कुंभार यांच्या फिर्यादीवरून तिघींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस नाईक पां येलकर पुढील तपास करीत आहेत.