देशातील संविधान धोक्यात असून, मनुचा कायदा परत आणणाऱ्याना, हदपार करणे गरजेचे. – काॅ. अतुल दिघे.
( सर्व श्रमिक, गिरणी कामगार व पेन्शनर संघटनेच्या वतीने शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर. )
आजरा.- प्रतिनिधी.

गिरणीकामगारना मुंबई येथे घरे देण्यात यावीत, यासाठी २००८ पासून सातत्याने रस्त्यावरची लढाई व मोर्चे आंदोलने सुरूच आहेत. २०१४ पासून आज अखेर शासनाने गिरणीकामगाराना झुलवत ठेवले असून, पात्र अपात्र यादी करण्याचे नाटक करून, गिरणीकामगारना मुंबई च्या बाहेर ठाणे, कल्याण येथे घरे देण्याचा जीआर या शासनाने काढला आहे, तो मागे घ्यावा नसेल तर भाजप आणी मित्र पक्षांना मतदान न करण्याचा निर्णय काॅ. अतूल दिघे यांनी किसान भवन आजरा येथील गिरणीकामगार व पेन्शन संघटना मेळाव्यात अध्यक्षीय स्थानावरून बोलताना व्यक्त केला. सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फोटोला पुष्प हार घालून ,अभिवादन करण्यात आले , यानंतर बोलताना काॅ. दिघे यांनी आपल्या देशातील संविधान धोक्यात असून, मनुचा कायदा परत आणणाऱ्याना, हदपार करणे गरजेचे आहे. वाढती महागाई बेरोजगारी नुसते जुमले देवून संपत नाही.माणसाची ग्रॅन्टी नसते तेथे मोदींची काय ग्रॅन्टी असा सवाल करून गावागावात गिरणी कामगारानी, आम्हाला मंबईत घरे नाहीत व जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तर भाजपाला मत नाही. अशा मजकुराचे मेसेज प्रत्येकाच्या दरवाज्यावर लावण्याचे आवाहन केले.
काॅ शांताराम पाटील यानी हे शासन शेतकरी व कामगार विरोधी असून शेती माला हम्मी भाव नाही मापात पाप करून खताचे दर वाढवले आहेत. गिरणीकामगाराच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यार्या शासनाला अद्दल घडवण्याची वेळ आली आहे.असे मनोगत व्यक्त केले यावेळी काॅ. शिवाजी सावंत ,काॅ. धोडिबा कुंभार,काॅ संजय घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शांताराम हारेर, मनप्पा बोलके, हसेन दरवाजकर ,बंडू कांबळे, माया कदम, जयश्री कुंभार, आक्काताई तेजम, नारायण राणे, हिंदूराव कांबळे, महादेव होडगे, आबा पाटील, दिपक दळवी याच्यासह गिरणीकामगार पेन्शनर उपस्थित होते सुत्रसंचालन व आभार नारायण भंडागे यांनी केले .