आजरा तालुक्यात
छत्रपती शिवाजी महाराजांचा “राज्याभिषेक दिन” उत्सहात साजरा.
आजरा. प्रतिनिधी. दि.६
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमीपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करत आजरा तालुक्यातील पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात आला. ग्रामविकास
मंत्री. हसन मुश्रीफ यांनी रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार! शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासही मन न दाखवने, अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सतराव्या शतकात या महाराष्ट्रात भूमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधिशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युध्दे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जातीधर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार, जिवाभावाचे मावळे एकत्र करुन हा लढा दिला. अनेक किल्ले सर केले. जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक वटहुकुम काढले. या महाराष्ट्रातील तमाम जातीधर्माचे लोक या स्वराज्याच्या कार्यात सामील झाले. याचबरोबर
स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पं. स. जि. प. मध्ये साजरा करावा अशा सुचना देण्यात आल्या होत्या. आजरा तालुक्यातील पंचायत समिती मध्ये सभापती उदयराज पवार, उपसभापती वर्षा बागडी, सर्व पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत तर तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये “शिवराज्याभिषेक दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
【मडिलगे ता. आजरा येथील ग्रामपंचायत मध्ये राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी सरपंच गणपतराव आरळगुंडकर, ग्रामसेविका कविता जाधव, सदस्य दयानंद पोवार, प्रा. शिवाजी गुरव तसेच सर्व सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस, ऑपरेटर शारदा गुरव कर्मचारी दत्ता जाधव राजाराम येेसणे , ग्रामस्थ आदी उपस्थित होते . राष्ट्रगीताने शिवराज्याभिषेक दिनाची सांगता करण्यात आली.】
