HomeUncategorizedमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ठाण्यात भेट न झाल्याने दादा भुसे, उदय सामंत व...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ठाण्यात भेट न झाल्याने दादा भुसे, उदय सामंत व हेमंत गोडसे राहिले 2 तास ताटकळत🟥अखेर श्रीकांत शिंदेंशी चर्चा करून गोडसे नाशिकला रवाना🔴न्यायालयांवर विशेष गट दबाव टाकतोय‌.- 👉आधी आरोप करतात.- हरीश साळवेंसह ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र.👇👇

🛑मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ठाण्यात भेट न झाल्याने दादा भुसे, उदय सामंत व हेमंत गोडसे राहिले 2 तास ताटकळत
🟥अखेर श्रीकांत शिंदेंशी चर्चा करून गोडसे नाशिकला रवाना
🔴न्यायालयांवर विशेष गट दबाव टाकतोय‌.- 👉आधी आरोप करतात.- हरीश साळवेंसह ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र.👇👇

ठाणे :- प्रतिनिधी.

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीची दुसरी यादी जाहीर होण्यापूर्वी अनेक नाट्यमय घडोमोडी घडत असल्याचं दिसतंय. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दादा भुसे, उदय सामंत, हेमंत गोडसे हे जमा झाले असताना मुख्यमंत्री वेळेत न पोहोचल्याने त्यांना ताटकळत बसावं लागलं.शेवटी दोन तासांनी दादा भुसे, उदय सामंत आणि हेमंत गोडसेंनी ठाण्यातून काढता पाय घेतला. मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्याने वैतागलेले हेमंत गोडसे नाशिकला निघून गेले तर उदय सामंत, दादा भुसे आणि इतर नेते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

🛑श्रीकांत शिंदेंशी चर्चा करून नेत्यांचा काढता पाय

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेण्याच्या निमित्ताने आलेले शिवसेना नेते दादा भुसे आणि सुहास कांदे दोन तासांपासून प्रतीक्षेत होते. तर एका तासापासून किरण सामंत आणि उदय सामंत प्रतीक्षेत होते. नंतर हेमंत गोडसे हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले, पण त्यांनाही मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. शेवटी श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हेमंत गोडसे पुन्हा नाशिकला गेले. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री नेमके कुठे गेले होते याचा पत्ता त्यांच्या विश्वासू नेत्यांनाही नव्हता.

🔴उदय सामंत, दादा भुसे, हेमंत गोडसे परत गेले

दादा भुसे, सुहास कांदे, किरण सामंत, उदय सामंत असे अनेक नेते ठाण्यातील त्यांच्या घरी जमले होते. मात्र मुख्यमंत्री कधी येणार हे कोणालाही माहिती नव्हतं. त्यामुळे या सर्व नेत्यांनी दोन तास वाट पाहून शेवटी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वाट बघून हेमंत गोडसे नाशिकला परतले. तर दादा भुसे, सुहास कांदे यांनी त्यानंतर काही वेळ वाट पाहिली. पण मुख्यमंत्री वेळेत पोहोचले नसल्याने या नेत्यांनी आपली वाट धरली.

🟥हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात?

शिंदेंच्या शिवसेनेने त्यांचे आठ उमेदवार जाहीर केले असून आणखी चार ते पाच ठिकाणच्या उमेदवारांची नावं घोषित होणं बाकी आहे. त्यापैकी सर्वात मोठा वाद होतोय तो नाशिकच्या जागेवरून. नाशिकमध्ये सेनेचे खासदार हेमंत गोडसे हे असून त्यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी मोर्चा उघडला आहे. तसेच साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या अजितदादांना देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं बोललं जातंय. त्यासाठी हेमंत गोडसेंनी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. शुक्रवारी संध्याकाळीही ते याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदंच्या भेटील आलेले.

🔴सिंधुदुर्गातून किरण सामंत आग्रही

दुसरीकडे सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेदेखील आग्रही आहेत. भाजपने या मतदारसंघावर दावा केला असून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याच वेळी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार देण्यात यावा अशी मागणी उदय सामंत यांनी केलीय. रायगड राष्ट्रवादीला सोडल्यानंतर कोकणातील दुसरा मतदारसंघ तरी आपल्याकडे राहावा यासाठी उदय सामंत प्रयत्नशील असल्याने ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते.

🔴न्यायालयांवर विशेष गट दबाव टाकतोय‌.- 👉आधी आरोप करतात.- हरीश साळवेंसह ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र.
(🛑हे नेते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आधी आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्याला वाचवितात. हे लोक न्यायपालिकेच्या निकालांना प्रभावित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा खळबळजनक दावा हरीश साळवे यांनी केला.)

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

देशात लोकसभा निवडणूक सुरु झाली आहे. याचवेळी ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि देशभरातील ६०० हून अधिक वकिलांनी सरन्यायाधीशांना न्यायपालिकेला एक विशेष गट कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पत्र लिहिले आहे. हे लोक न्यायपालिकेच्या निकालांना प्रभावित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा खळबळजनक दावा साळवे यांनी केला आहे.
🟥यामध्ये साळवे व वकिलांनी कोणत्या प्रकारच्या प्रकरणांत हे केले जात आहे त्याचाही उल्लेख केला आहे. खासकरून राजकीय नेत्यांशी संबंधीत प्रकरणे, नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा प्रकरणांमध्ये हा दबाव वाढत चालला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या लोकांची कारस्थाने लोकशाही आणि न्यायपालिकेवरील विश्वासूपणासाठी धोकादायक असल्याचेही म्हटले आहे.
🛑हरीश साळवे यांच्यासह नन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होला, स्वरूपमा चतुर्वेदी यांच्याही या पत्रावर सह्या आहेत. हा गट वेगवेगळ्या प्रकारे न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. हा गट आपल्या राजकीय दृष्टीकोणातून न्यायालयांच्या निर्णयांवर बाजू घेणे किंवा टीका करण्याचे काम करत आहे. सोबतच बेंच फिक्सिंगही थिअरी याच लोकांनी मांडली होती, असेही या पत्रात म्हटले आहे.
🟥हे नेते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आधी आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्याला वाचवितात. अशात जर त्यांच्या मनाविरोधात निकाल आला तर ते कोर्टात किंवा प्रसारमाध्यमांवर न्यायालयावरच टीका करण्यास सुरुवात करतात. काही शक्ती न्यायाधीशांना प्रभावित करणे किंवा त्यांना आपल्या बाजुने निकाल देण्यासाठी दबाव टाकण्याचेही काम करत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही असे पहायला मिळाले होते. यामुळे न्यायालये वाचविण्यासाठी या विरोधात कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी साळवेंनी पत्रातून सरन्यायाधीशांकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.