HomeUncategorizedव्यंकटराव हायस्कूल,आजरा मध्ये शहीद दिन विविध उपक्रमांनी साजरा.

व्यंकटराव हायस्कूल,आजरा मध्ये शहीद दिन विविध उपक्रमांनी साजरा.

व्यंकटराव हायस्कूल,आजरा मध्ये शहीद दिन विविध उपक्रमांनी साजरा.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे शहीद दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला
२३ मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून व्यंकटराव हायस्कूलमधील ‘इयत्ता आठवी अ’ च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या शहिदांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन सर्व शिक्षक वृंदाच्या हस्ते करण्यात आले.भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या व्यक्तिचित्रांचे रांगोळीच्या रूपात रेखाटन शलाका गिरी व रिया देशमुख या विद्यार्थिनीनी लक्षवेधक केले होते.शहिदांच्या व्यक्तिमत्त्वांच्या जीवन प्रसंगावर आधारित विद्यार्थी व पालकांच्या हृदयाला पाझर फोडणारे ‘स्वातंत्र्यासाठी शहिदांचे बलिदान’ या विषयावरील नाटक बालकलाकार ईशान मोटे, प्रेम येसने, यशराज कुंभार, सुयश देसाई, शार्दुल आजरेकर, संस्कार पापरकर, कार्तिक हुबळे आणि अंशुमन भोसले या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या वेशभूषा व संवादामध्ये सादर केले.कल्पक सुतार,अंशुमन भोसले, प्रणव पाटील, सृष्टी नाईक, ऋषा देसाई, स्वरा दोरुगडे या विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेल्या शहिदांच्या व्यक्तिमत्त्वांच्या रेखाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या निमित्ताने प्रणव पाटील, वेदिका केदारगोळ, अंशुमन भोसले, संस्कार पापरकर, सिमरन पाटील यांनी शहीद दिनाचे महत्त्व व विविध शहिदांच्या जीवनचरित्राचा कालपट विद्यार्थ्यांसमोर भाषणातून उलगडला. रिया देशमुख या विद्यार्थिनीने शहिदांच्या जीवनचरित्राविषयीची कविता काव्यगायनातून सादर केली. प्राचार्य आर. जी. कुंभार यांनी शहीद दिनाचे महत्त्व व शहिदांविषयीचे आपले विचार व्यक्त केले. रांगोळी रेखाटण्यासाठी कलाशिक्षक के. ए. दावणे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचा समारोप शलाका गिरीच्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या देशभक्तीपर गीत गायनाने झाला. बिगुल वाजवून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती नरके व सिमरन पाटील यांनी केले.सदरहू कार्यक्रमाचे आयोजन वर्गशिक्षक प्रशांत गुरव यांच्या संकल्पनेतून साकार झाले. कार्यक्रमासाठी प्राचार्य आर.जी. कुंभार, पर्यवेक्षिका व्ही.जे.शेलार, सर्व शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंत शिंपी यांचे सह सर्व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.