HomeUncategorizedशेअर मार्केटिंग च्या नावाने बोगस कंपनी स्थापन करुन नागरीकांना कोट्यावधी चा चुना...

शेअर मार्केटिंग च्या नावाने बोगस कंपनी स्थापन करुन नागरीकांना कोट्यावधी चा चुना लावणारा पिनॉमिक कंपनीचा विपुल पाटील याला अटक करा व अशा अनेक कंपनी च्या फरारी संचालकाना अटक करा “ – श्री .शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांची मागणी

शेअर मार्केटिंग च्या नावाने बोगस कंपनी स्थापन करुन नागरीकांना कोट्यावधी चा चुना लावणारा पिनॉमिक कंपनीचा विपुल पाटील याला अटक करा व अशा अनेक कंपनी च्या फरारी संचालकाना अटक करा “ – श्री .शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांची मागणी

कोल्हापूर. – प्रतिनिधी.

शेअर मार्केटिंग च्या नावाने बोगस कंपनी स्थापन करुन नागरीकांना कोट्यावधी चा चुना लावणारा पिनॉमिक कंपनीचा विपुल पाटील याला अटक करा व अशा अनेक कंपनी च्या फरारी संचालकाना अटक करा “ अशा आशयाचे निवेदन सुनीलजी फुलारी (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र ) व संदिपजी घुगे (सांगली जिल्हा पोलीस आधीक्षक ) यांची पोलिस मुख्यालय यांना श्री. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांच्या वतीने
देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या अडीच वर्षापासून शेअर मार्केटिंग गुंतवणुकीच्या नावाने स्थापन झालेल्या बोगस कंपनी च्या विरोधत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान च्या माध्यमातुन सुरु असलेल्या आंदोलना बाबात महिती देत आतापर्यंत जवळपास १८ कंपनी च्या संचालकांच्या विरोधात सांगली जिल्ह्यामध्ये गुंतवणूकदारांनी फिर्यादी दाखल केल्या आहेत. या मध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणा वरती हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणारा पिनॉमिक कंपनी चा विपुल पाटील राहणार तासगाव याच्या वरती सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटक मध्ये गुन्हा दाखल झाला, त्या नंतर अटक पूर्व जामीन साठी त्याने अर्ज केला तो अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मे २०२३ मध्ये फेटाळला मात्र अजून सुद्धा तो फरार आहे त्याच्या बरोबर ब्रेटवेल ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनी चा अमित भंडारी, ड्रीम मल्टी ट्रेड चा समीर हुसेन, म एगजिम अग्रो चे अशोक रास्ते आणि शरद कुलकर्णी हे अजून फरारी आहेत या सगळ्यांना शोधून ताबडतोब अटक करावी व त्यांची संपत्ती जप्ता करुन सर्व सामान्य जनतेचे पैसे परत मिळवून द्यावे अशी मागणी आयजी व एसपी साहेब यांच्याकडे केली
याच बरोबर सांगली शहरामध्ये सुरु असलेल्या अवैद्य कॉफी शॉप संदर्भात सुरु असलेल्या आंदोलनाच्या बाबत माहिती दिली .सांगली पोलीसांनी अनेक अश्या कॉफी शॉप वर कारवाई केली मात्र अजुन ही काही ठिकाणी असे अवैध कॅफे शॉप चालु आहेत याची माहिती देऊन निवेदन देण्यात आले आहे.
या दोन्ही विषयांवर IG आणि SP यांनी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले
यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन दादा चौगुले, जिल्हा प्रमुख रणजीतदादा चव्हाण, शहर प्रमुख दिगंबर साळुंखे, सेनापती आनंदराव चव्हाण तात्या, प्रशांत गायकवाड, दत्ता भेंडवडे साहेब, दगडु कमलाकर सर, राजेश खन्ना,ओंकार चौगुले, सुरेंद्र इंगळे सरकार, विनायक आवटी इत्यादी युवा सहकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.