जल जीवन मिशन योजनेच्या पाण्याच्या टाकीची जागा बदलणे बाबत. गटविकास अधिकारीसो, पं स. आजरा. यांना कोरीवडे.ग्रामस्थाचे निवेदन.
आजरा. प्रतिनिधी.
कोरीवडे ता. आजरा येथील जल जीवन मिशन योजनेच्या पाण्याच्या टाकीची जागा बदलणे बाबत. गटविकास अधिकारीसो, पं स. आजरा. यांना कोरीवडे.ग्रामस्थाचे निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रत्येक ग्रामस्थांला नळाच्या पाण्याचे कनेक्शन देण्याच्या उद्दिष्टाने पी. एम. मोदींनी जल जीवन मिशन सुरू केले होते. जल जीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भारतातील सर्व घरांना दीर्घ कालावधीसाठी देणे सुरू करणे आहे. २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ कनेक्शनद्वारे शुद्ध, सुरक्षित आणि पुरेसे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व सदर काम चांगल्या दर्जाचे असणे असे असताना. कोरीवडे ता. आजरा येथे
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम चालु असुन सदर कामाच्या पाण्याच्या योजनचे काम मौजे. कोरीवडे मथील गर नं २९६ मध्ये चालु आहे. तरी सदरच्या कामामध्ये टाकी बांधकामा जी जागा निवडली आहे. ती जागा ग्रामपंचायत कोरीवडे ग्रामपंचायतने घेतलेली पैकी नाही. म्हणजेच जागेचे त्या वेळचे मुळ मालक धोंडिबा कृष्णा पाटील यांनी रहदारीच्या रस्त्यालगत सदु बाळा पाटील यांच्या जमिनीच्या बाजूला दिली होती. पण त्यावेळच्या करारपत्रक मध्ये चतुर सिमा घातलेल्या नाहीत. पण ज्यांनी ती जागा दिली होती. ती व्यक्ती समक्ष येऊन जागेची खातरजमा करणेस तयार असताना ग्रामपंचायत पद्माधिकारी यांना विश्वासात न घेता जाणिवपूर्वक अडचणीतील जागा घेण्याचे कबुल करत आहेत. सदरची जागा बांधकाम करणेसाठी किंवा पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या रहदारीसाठी अतिशय अयोग्य आहे. तरीसुद्धा जाणीवपूर्वक ग्रामपंचायत पदाधिकारी जी जागा मुळात ग्रामपंचायत ची नाही. अशा जागेचा आग्रह धरत आहेत. तरी ग्रामपंचायत ने २९६ गटातील जाग प्रत्यक्ष ज्या व्यक्तीकडून घेतली व कोणत्या ठिकाणी घेतली यांची खातरजमा केले शिवाय सदरच्या पाण्याच्या टाकीचे काम करू नये असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर ग्रामस्थ संतोष पाटील यांची सही आहे.
याबाबत यातील अर्जदार ग्रामस्थ संतोष पाटील यांना विचारणा केली असता श्री. पाटील यांनी मुळातच जागा ग्रामपंचायत जागा कोणाची व काय मनमानी कारभार चालु आहे. याबाबत आज फक्त निवेदन दिले आहे.याची चौकशी होऊन योग्य ठिकाणी व काम चांगल्या दर्जाचेही नाही. याबाबत गुरुवारी आंदोलनाचा इशारा देण्यात येणार असल्याचे निवेदन ग्रामस्थ यांच्या वतीने देणार असल्याचे सांगितले आहे.
