HomeUncategorizedकुर शाखा कालवा किमी १ ते १७ चे अस्तरीकरण प्रकल्प खर्चातून करण्यास...

कुर शाखा कालवा किमी १ ते १७ चे अस्तरीकरण प्रकल्प खर्चातून करण्यास शासनाची मान्यता :- आम. प्रकाश आबिटकर

कुर शाखा कालवा किमी १ ते १७ चे अस्तरीकरण प्रकल्प खर्चातून करण्यास शासनाची मान्यता :- आम. प्रकाश आबिटकर

गारगोटी प्रतिनिधी.

भुदरगड तालुक्यातील कुर शाखा कालवा कि.मी. १ ते १७ चे अस्तरीकरण करण्यासाठी प्रकल्पीय खर्चातून करण्याकरीता राज्य शासनाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दूधगंगा मोठा प्रकल्प ता.राधानगरी, जि.कोल्हापूर येथील कूर शाखा कालवा कि.मी. १ ते १७ चे अस्तरीकरण करण्याबाबतची मागणी या परिसरातील कूर, कोनवडे, नाधवडे निळपण, पाचवडे, दारवाड, बसरेवाडी, मिणचे खुर्द यासह विविध गावातील शेतकरी बांधवांमार्फत करण्यात आली होती. याबाबत सदरील पोट कालवा प्रकल्पाच्या मंजूर तृतीय प्रशासकीय अहवालामध्ये समावेश नसल्यामुळे अस्तरीकरण करण्यासाठी अडचणी येत होत्या. याबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत याकामासाठी मंजूरी देण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्यास यश आले असून कालव्याचे अस्तरीकरण करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.

सदरच्या सर्व कामाचा खर्च हा दूधगंगा प्रकल्पाच्या चतुर्थ प्रशासकीय मान्यता प्रस्तावामध्ये अंतर्भूत करण्याच्या अटीस अधीन राहून प्रकल्पाच्या उर्वरित खर्चातून करण्यास परवानगी मिळाली आहे. याबाबत शासनाचे आवर सचिव श्री.संदीप भालेराव यांनी मंजुरी पत्र कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांना दि.१५ मार्च २०२३ रोजी निर्गमित केले आहे. त्यामुळे या परिसरामध्ये पाणी झिरपून शेती क्षारपड होण्याचा प्रश्न निकाली निघणार असून शेतकऱ्यांना वेळेत पाण्याच्या आवर्तन उपलब्ध होणार आहेत. या कामाची निविदा आचारसंहिता झालेनंतर प्रसिद्ध करून प्रत्यक्ष कामाची सुरुवात होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.