Homeकोंकण - ठाणेदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाने सोपवली 'ही' मोठी जबाबदारी.- कोणती जबाबदारी सोपवली पहा.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी.- कोणती जबाबदारी सोपवली पहा.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी.- कोणती जबाबदारी सोपवली पहा.

मुंबई. प्रतिनिधी. ५

महाराष्ट्रात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ आली असून या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून प्रभारीपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उत्तर प्रदेश मध्ये भाजपचे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस काम पाहतील, असं समजतं.
गुरुवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही फडणवीस उपस्थित होते, अशी माहिती आहे. लवकरच प्रभारीपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा समोर आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सी.पी. ठाकूर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे एक उत्तर नेते आहेत आणि निवडणुकांमध्ये ते उत्तम काम करतात,’ असं म्हणत सी.पी. ठाकूर यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.