🛑अपंगांच्या/दिव्यांगांच्या सोयी सवलती व निधीबाबत गडहिंग्लज बिडिओना निवेदनाने आंदोलनाचा इशारा
🛑पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणार्यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधून कारवाई करा ! – आजरा पोलीस आणि प्रशासन व तहसीलदार यांना निवेदन.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

अपंगांच्या/दिव्यांगांच्या सोयी सवलती व निधीबाबत निवेदनाने आंदोलनाचा इशारा मंगळवार ५ रोजी मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती गडहिंग्लज यांना देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिव्यांग / अपंग कल्याणनिधी शासन निर्णयानुसार सर्व संबंधीत लाभार्थ्यांना वाटप झाला आहे. किंवा नाही याची सखोल चौकशी करुन दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधीतांवर ताबडतोब कार्यवाही करुन संबंधीत लाभार्थ्यांना वाटप न झालेला निधी ताबडतोब वाटप करणे गरजेचे होते. मात्र ते आजतागायत खर्च केलेला दिसत नाही. अनेकवेळा संबंधीत लाभार्थ्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना वेळोवेळी तोंडी विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्यामुळे हा निधी प्रत्येक आर्थिक वर्षात परिपूर्ण व शासकीय दृष्ट्या नियमाला धरून केला पाहिजे.याकडे आपण लक्ष दिले नाही.तर आजरा पंचायत समिती समोर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने दिव्यांग/अपंग व्यक्तींसाठी पासून गडहिंग्लज पंचायतीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत.

चौकट
या निवेदनातील प्रमुख मागण्या.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील सन. २०१४/१५ व २०२३/२४ या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार तरतूद करण्यात आलेला 5 % राखीव निधी त्याचा ताबडतोब अनुशेषासह परिपूर्ण विनीयोग झालाच पाहिजे. तसेच दिव्यांग / अपंग कल्याणनिधी शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधीत लाभार्थ्यांना वाटप न झालेला निधी अनुशेषासह पूर्णपणे खर्च केला पाहिजे. याची अंमलबजावणी प्रत्येक आर्थिक वर्षात वाटप झाला आहे का?याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा.तसेच दिव्यांग/अपंग कल्याणनिधी शासन निर्णयानुसार सर्व संबधित लाभार्थ्यांना ताबडतोब वाटप करणेबाबत, प्रत्येक ग्रामपंचायतीने घरफळामध्ये ५० टक्के सवलत दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाला आहे. ती सवलत दिली पाहिजे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, अपंगांना/ द्विव्यांगांना शासनाच्या मालकी जागेत व्यवसाय करण्यासाठी दुकान गाळे प्राधान्यक्रमाने दिलेच पाहिजेत. ज्या गावात दुकान गाळे शासनाच्या व ग्रामपंचायतीच्या मालकीचे आहेत. तेथे अपंगांना/ दिव्यांगांना दुकान गाळे प्राध्यान्य क्रमाने दिले आहेत का नाही? याची चौकशी झाली पाहिजे, अपंगांना व दिव्यांगांना योजना व सवलती माहिती होण्यासाठी प्रत्येक, ग्रामपंचायतीने अपंगांच्या/ दिव्यांगांच्या येणाऱ्या योजना व सवलती यांची माहिती होण्यासाठी पत्रव्यवहार करावा, अपंगांना व दिव्यांगांना योजना व सवलती माहिती होण्यासाठी या संदर्भात तालुका पातळीवर एक माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करावी., दिव्यांगांसाठी आपल्या पंचायती समितीच्या व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्यावतीने वेगवेगळ्या दिव्यांगांच्या योजनांची माहिती देणाऱ्या गोष्टींचे प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात याव्यात, आपल्या तालुक्यातील दिव्यांगांची परिपूर्ण यादी गावासह आम्हाला मिळावी.आमच्या ईमेलवर अथवा टपालाद्वारे ही यादी मिळाली पाहिजे.
वरील विषयांबाबतीत आणि मागण्यांच्या बाबतीत आपण गांभीर्यपूर्वक लक्ष नाही दिले तर येत्या २० दिवसात आपल्या पंचायती समिती कार्यालयासमोर मुक्ती संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने आंदोलन करणार आहोत. या आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, सुरेश खोत, रविंद्र भोसले, किरण पाटील, राजेंद्र नाईक, सविता पाटील, भारती पवार, नाईक मावशी हे सर्व उपस्थित होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणार्यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधून कारवाई करा ! – आजरा पोलीस आणि प्रशासन व तहसीलदार यांना निवेदन.
आजरा. - प्रतिनिधी.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी अनेक युवकांना दिशा देऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कृतिशील केलेले आहे. अशा ऋषीतुल्य व्यक्तीमत्व असलेल्या पू. भिडेगुरुजी यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा आणि त्यांना त्रास देण्याचा, तसेच त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार होत आहे. मनमाड (जिल्हा नाशिक) येथे २९ फेब्रुवारीला काही माथेफिरूंनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला. गाडीच्या काचा फोडण्याचा गंभीर प्रकार केला. तरी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड हल्ला करणार्यांचा मास्टरमाईंड शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन आजरा येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आजरा व सर्व हिंदुत्ववादी यांच्या कार्यकर्त्यांनी आजरा वतीने
यावेळी प्रथमेश काणेकर संदीप पारळे चेतन बुरुड उमेश परपोलकर सतीश शिंदे विशाल नाईक सतीश पवार ऋषी सावंत सुयोग बेळगुंदकर आदी उपस्थित होते.