Homeकोंकण - ठाणेराज्यातील HSC परीक्षा रद्द. आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या बैठकीत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर.

राज्यातील HSC परीक्षा रद्द. आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या बैठकीत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर.

राज्यातील HSC परीक्षा रद्द.
आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या बैठकीत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर.

【 राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सीबीएसई,आयसीएसई, हरयाणा आणि गुजरात सरकारनं देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.】
मुंबई. प्रतिनिधी. ३
महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्राकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर विचार करुन केंद्रानं सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या.
राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. अशात विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याकारणाने राज्य सरकारने १० वीची परीक्षा रद्द केली होती. मात्र, १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, १२ वीची परीक्षाही रद्द करण्यात यावी अशी मागणी होत होती.
आज दि.३ जून अखेर यावर शिक्कामोर्तब झालं आहे. १२ वीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत १२वी परीक्षा रद्द करण्यावर चर्चा झाली होती. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनाला राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला होता. आजच्या बैठकीत तो मान्य झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या (२ जून) बैठकीनंतर शालेय शिक्षममंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी असं सांगितलं की, शिक्षण खात्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवणार होते. या प्रस्तावावर चर्चा करुन मगच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण परिस्थीतीची माहीती बैठकीत दिली असल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.