– शरदचंद्र पवार हे नाव निवडणुकांपर्यंत कायम ठेवा.- शरद पवार गटाला एका आठवड्यात नवे चिन्ह द्यावे. – सुप्रिम कोर्टाचे निवडणुक आयोगाला आदेश.
🛑आजरा तालुक्यात सर्वत्र शिवजयंती उत्साहात संपन्न.- आजरा व मडिलगेत महिलांच्या लेझीम पथकाने अली कार्यक्रमाला रंगत.
नवी दिल्ली:- वृत्तसंस्था.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाची बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याची मुदत दिली आहे. तसेच निवडणुकांपर्यंत राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेऊन एका आठवड्यात नवे चिन्ह देण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवारांच्या बाजूने दिल्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह तसेच शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत.
🟥सर्वप्रथम, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाला मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवण्याची विनंती केली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करण्याची असल्याने हेच नाव द्यावे, असे मनु सिंघवी म्हणाले. या मागणीनुसार शरद पवार गटाने चिन्ह मागितल्यावर एका आठवड्याच्या आत चिन्ह द्यावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचबरोबर निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यांनी होणार आहे.
🛑आजरा तालुक्यात सर्वत्र शिवजयंती उत्साहात संपन्न.- आजरा व मडिलगेत महिलांच्या लेझीम पथकाने अली कार्यक्रमाला रंगत.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात आजरा शहरासह ग्रामीण भागातील गावांमध्ये शिवजयंती पारंपारिक वाद्य व लेझीम पथक झांज गजरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आजरा येथे मराठा महासंघ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त महिलांसाठी लेझीम पथक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये श्री सातेरी देवी युवती लेझीम पथक या पथकाने प्रथम क्रमांक,आजरा येथील शिवतीर्थवर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते करण्यात आले. शिवजयंतीचे औचित्य साधून मराठा महासंघाच्या आजरा शाखेच्यावतीने महिलांच्या लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कोवाडे येथील सातेरी कन्या महिला लेझीम संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, लाकूडवाडी संघाने द्वितीय तर देवकांडगांव झुंजार महिला लेझीम पथका संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. या संघांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, व ४ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर हाजगोळी, मसोली व देवर्ड येथील लेझीम संघांना प्रत्येकी २ हजार रूपये व सन्माचिन्ह देऊन उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
विजेत्या संघांना मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारूती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, अमर त्रिभुवणे, महादेव पोवार, गीता नाईक, सुनंदा मोरे, गौरी भोसले, रचना होलम, धनश्री देसाई आदि मान्यवरांच्या हस्ते पुरस्व वितरण करण्यात आले.
🛑🚩मडिलगे ता.आजरा येथे जंगदम बॉईज तरुण मंडळाने सामानगडावरून शिवज्योत आणली होती या शिवज्योतीचे स्वागत व मिरवणूक काढण्यात आली. यानंतर शिवरायांची महारती व दिवसभर पारंपारिक खेळांचे, प्रदर्शन तसेच किल्ल्याचे उद्घाटन व सायंकाळी महिलां व पुरुषांचे लेझीम पथक दान पट्टा, अशी विविध प्रात्यक्षिके कार्यक्रम करत शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जगदंब बॉईज तरुण मंडळाचे सर्व शिवभक्त कार्यकर्ते तसेच सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने शिवजयंती मिरवणूक व कार्यक्रमात सहभागी झाले होते. अत्यंत शिवमय वातावरणात शांततेत शिवजयंती उत्सव कार्यक्रम पार पडला.
असाच शिवजयंती उत्सव ग्रामीण भागातील आणि गावांमध्ये शांततेत उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

