बाळशास्त्री जांभेकर यांच्या सिंधुदुर्गातून पत्रकारांना लसीकरण हा स्तुत्य उपक्रम.
आम.नितेश राणे यांनी जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे केले कौतुक.
कणकवली. प्रतिनिधी.३.
सिंधुदुर्ग जिल्हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जिल्हा आहे.त्यामुळे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिल्ह्या पासूनच पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून लस देण्याचा जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांनी सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असल्याचे उद्गार आम. नितेश राणे यांनी काढले. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे भाजपाच्या केंद्रातील सत्तेला सप्त वर्षपूर्ती निमित्त ऑक्सीजन कनेक्टर देण्यात आले या प्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते.
सिंधुदुर्गात 45 वर्षाखालील पत्रकारांना लसीकरण करण्याचा शुभारंभ करीत जि. प.सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यात सिंधुदुर्ग जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांनी 45 वर्षाखालील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून प्राधान्याने लसीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन 2 जून पासून सिंधुदुर्गातील 45 वर्षांखालील पत्रकारांना कोव्हीड लसीकरण सुरू केले. 45 वर्षाखालील पत्रकारांना लसीकरण करण्याचा सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यात अवलंबावा असे आवाहन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले.
इच्छाशक्ती असेल तर अडचणीतून मार्ग सापडतो. 45 वर्षाखालील पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत असलेल्या अडचणीवर मार्ग शोधण्यात आला. आणि प्रत्यक्षात लसीकरण सुरूही केले. याबाबत जि. प. अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विषय समिती सभापती यांनी चांगले टीमवर्क केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी कौतुक केले. राज्यातील 45 वर्षांखालील पत्रकारांना प्राधान्याने कोव्हीड प्रतिबंधक लस द्या अशी आग्रही मागणी पत्रकार मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडे करत होते. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या साथीने जिल्ह्यातील 45 वर्षांखालील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून 2 जूनपासून लसीकरण सुरू केले. सिंधुदुर्गात सुरू झालेला हा उपक्रम राज्याला पथदर्शी असून हा सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यात सुरू करावा असे आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, सभापती मनोज रावराणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,नगरसेविका मेघा गांगण,महेश गुरव,संतोष कानडे, बबलू सावंत, अण्णा कोदे व अन्य उपस्थित होते.