कै. सदाशिव जाधव.- यांच्या कार्याचा सुगंध नेहमी दरवळत राहील.- भिकाजी गुरव माजी सभापती. 【कै.जाधव.- यांच्या जन्मदिनानिमित्त जाधव परिवाराने केले. – वृक्ष वाटप.】
आजरा. प्रतिनिधी. दि.२
आजरा मडिलगे येथील आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक व भावेश्वरी समूहाची सदस्य कै. सदाशिव बाळकू जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त जाधव परिवाराने दि.२/६ /२०२१ रोजी मडिलगे येथील सर्व दुध संस्थांमध्ये विविध फुलांची झाडे वाटप करून त्यांचा कार्याचा सुगंध दरवळत राहावा अशी प्रार्थना केली.
मडिलगे गावातील सर्व दूध संस्थांमध्ये दूध उत्पादकांना या झाडाचे वाटप करताना भावेश्वरी समूहाचे प्रमुख भिकाजी गुरव व सर्व संचालक यांच्या उपस्थितीत वाटप करताना श्री गुरव म्हणाले जाधव परिवाराने कै सदाशिव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त फुलांच्या झाडांचा वाटपाचा हा राबवलेला उपक्रम आठवणींना उजाळा देणारा आहे. गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत त्यांच्यासोबत काम करताना यामधील खरोखर काही क्षण अविस्मरणीय आहेत. ते आम्ही सर्व समूहाचे प्रमुख, सदस्य कधीही विसरू शकत नाही. त्यांचं संयमी वागणं-बोलणं व त्यांच्या कार्याचा गौरव या सुगंधी फुलातून कायम दरवळत राहावा यासाठी हा उपक्रम जाधव कुटुंबाने राबवला ते आमच्यातून निघून गेले असले तरी ते आमच्या सोबत कायम त्यांचा आशीर्वाद असेल असे श्री गुरव बोलताना म्हणाले.
यावेळी माजी सरपंच दिपक देसाई , तानाजी कडगावकर, सुशांत गुरव, प्रकाश कडगावकर, महादेव जाधव, पांडुरंग जाधव, राजाराम येेसने, प्राा. शिवाजी गुरव , जानबा ढोकरे , बंडोपंत कातकर, मधुकर गुरव, व,श्री. राम दूध संस्थेचे सर्व संचालक, जाधव परिवारातील सर्व सदस्य, दूध उत्पादक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार माजी सरपंच श्री देसाई यांनी मानले.