तरुणाने मानेवर ब्लेडने वार करुन घेवून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न. आजरा बाजारपेठेत घडली घटना.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील बाजारपेठ रस्त्यावर नितीन भिमराव होवाळ (वय ३२ मुळगांव सांगली, सद्या रा.आजरा) या विवाहीत तरुणाने मानेवर ब्लेडने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान भररस्त्यात घडली.
नितीन हा गेली १० वर्षे पासून आजरा येथे स्लायडींगची कामे करत रहात होता. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.त्याला दारुचे व्यसन होते.नेहमी पत्नीशी त्याचा वाद होत असे. तो तीला मारहाण करायचा .हे प्रकरण अनेकदा पोलीसात ही गेले होते पोलिसांनी त्याला समजावून पाठवले होते.
काल दिवसभर तो नशेत होता.सायंकाळी ६ च्या दरम्यान नितीन बाजारपेठेतील एका दुकानाच्या पायरीवर बसला होता.अचानक त्याने सोबत घेऊन आलेल्या ब्लेडने मानेवर वार करुन घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत तो घरी जात असताना रस्त्यावर पडला. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र सर्जरीची सोय नसल्याने पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे.