Homeकोंकण - ठाणेकोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ .- मुख्यमंत्री...

कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ .- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ .- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

कोल्हापूर. – प्रतिनिधी.

शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्‍याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील किमान एक लाखा पेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी दि. १४ रोजी कोल्हापूर तपोवन मैदानावरील मेळाव्यात ते बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, आपला उद्देश प्रामाणिक असला म्हणजे सर्व बाजूने लोक सोबत जोडले जातात. “शासन आपल्या दारी” हे अभियान देशात विक्रमी ठरेल आणि महाराष्ट्राचे उदाहरण देशासमोर राहील याची मला खात्री आहे. हे एक क्रांतिकारी अभियान राज्यात सुरु झाले आहे. १३ मे रोजी पाटण येथून संपूर्ण राज्यात या अभियानाची सुरुवात झाली. आज १४ जुन म्हणजे केवळ काही दिवसांत लाखो लाभार्थींची नोंद यात होत आहे. हे विशेष आहे.
शासन आपल्या दारी योजना
‘शासन आपल्या दारी’ या अभियानावर मुख्यमंत्री सचिवालयाचे पूर्ण नियंत्रण आणि देखरेख आहे. शेतकरी हा केंद्र बिंदू माणून काम करत अहोत. ६६८ कोटी जिल्ह्यात दिले आहेत. गावाचा कायापालट करणारी योजना आहे. छत्रपती शाहुचीभूमी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वीरित्या एका छताखाली राबविण्यात येत आहे. याचा आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर,मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच खास. धर्यशील माने, संजय मडलिक, माजी आम. सुरेश हाळवणकर, माजी राजेश.क्षिरसागर,सह अन्य मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी
आम. भरत गोगावले, खास. धनजंय महाडिक, आम. प्रकाश आबिटकर, आम. प्रकाश आवाडे,आम. राजेद्र पाटील (यड्रावकर), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, पोलिस महाअधीक्षक सुनिल कुमारे, माजी. आम. चद्रदिप नरके, भाजप. जिल्हा अध्यक्ष समरजीत घाटगे, शिवाजी पाटील,जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.