आजरा तालुका खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी…
कोण मारणार बाजी – परिवर्तन होणार का.? मतदान १३ रोजी.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुकीची प्रचाराच्या रणधुमाळीला चांगलीच रंगत आली जागा वाटपामध्ये तडजोड न झाल्याने अखेर ही निवडणूक लागली असल्याने या निवडणुकीत सत्ताधारी यापूर्वी कै. राजारामबापु यांच्या नेतृत्वाखाली तालुका खरेदी विक्री संघ उभा होता. व त्याच्याच आशीर्वादाने आजही सत्ताधारी यांचे वर्चस्व आहे. कै राजारामबापू देसाई यांच्या गटाचं नेहमीच या शेतकरी संघावर वर्चस्व राहिलेले आहे. कै राजाराम बापू नंतर आजरा खरेदी विक्री संघाचे नेतृत्व त्यांचे सुपुत्र के डी सी सी बँकेचे संचालक सुधीर देसाई रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या वतीने जेष्ट संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली पहात आहेत. या होत असलेल्या निवडणुकी कार्यक्रमात विरोधी गटामधून जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी हे विरोधी पॅनल तयार केले आहे. तर या निवडणुकीत बिनविरोध तडजोड न झाल्यामुळे जागा वाटपाच्या घोळात अखेर ही निवडणूक लागली विरोधी गटाने पाच जागेची मागणी केली होती परंतु सत्ताधारी मंडळींनी हा प्रस्ताव अमान्य केल्यामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागले विरोधी आघाड्याकडून मागणी केलेल्या पाच जागा नाही दिल्यास निवडणूक रिंगणातून कदाचित बाहेर विरोधी आघाडी जाईल असा काही जणांचा अंदाज होता. परंतु हा अंदाज चुकला व अखेर दुरंगी लढत लागलीच. परंतु या निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक असणार आहे. असं बोलले जाते. कोणाचं पारड जड यापेक्षा मतदार कौल कोणाच्या बाजूने देणार हे देखील महत्त्वाचे आहे. कमी पैशाचे सभासद मतदार कमी करण्यासाठी झालेला प्रयत्न व विरोधी आघाडीने घेतलेली या विरोधातली सभासदांच्या बाजूची भूमिका फायद्याची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सत्ताधारी यांनी जुन्या जेष्ट संचालकांना उमेदवारी न दिल्याचाही फटका बसू शकतो परंतु दोन्ही आघाडीचा प्रचार जोरात चालू आहे. अंतर्गत बैठका व गाठीभेटी जोर धरला आहे. चित्र आहे परंतु या निवडणुकीत एकास एक असा निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सभासदांमध्ये आहे.

परंतु सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व कायम राहील असेही बोलले जाते.
विरोधी परिवर्तन आघाडी परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र सद्यस्थितीला असून तालुक्यातील जुने जाणकार परिवर्तन आघाडीला पाठिंबा देत आहेत. मतदानाचा जसा दिवस जवळ येत आहे तसे रवळनाथ परिवर्तन आघाडीमध्ये परिवर्तन होताना दिसत आहे. प्रतीक्षात मतदान शनिवार १३ रोजी होणार आहे. परंतु यामध्ये कोण बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. पण संस्था गटातून सर्व सत्ताधारी उमेदवार विजयी होतील याची निश्चितपणे खात्री आहे. व्यक्तिगत सभासद गट तूर्तास वगळता संस्था गट व इतर संस्था गटातून निकाल हा सत्ताधारी च्या बाजूने लागेल असे बोलले जाते.
