Homeकोंकण - ठाणेआजरा येथे गिरणीकामगारांचा ३० एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन

आजरा येथे गिरणीकामगारांचा ३० एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन

आजरा येथे गिरणीकामगारांचा ३० एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील गिरणीकामगार ऑफिस मध्ये झालेल्या बैठकीत , मंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळाले पाहीजे यासाठी सरकारला जागे करण्यासाठी ३० एप्रिल रोजी १२ वाजता बाजार मैदान, शिवाजी महाराज पुतळा ते संभाजी चौक मोर्चाने येवून येथे रस्ता रोको अंदोलन करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. यावेळी काॅ शांताराम पाटील यानी मार्गदर्शन करताना , मुंबईतील गिरणीकामगारांच्या घरांचा रेगाळलेला प्रश्न मुख्यमंत्री यांनी सोडवलेला नाही .त्यांनी १८ जानेवारीला आश्वासन दिले होते. त्यानंतर ९ मार्चला मुख्यमंत्री यांचे ठाणे येथील घरावर मोर्चाचे आयोजन केल्यानंतर सर्व श्रमिक संघटना समवेत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे मान्य केले परंतू आजतागायत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही . अधिवेशनात आमदार आबीटकर यांनी ५८ मिलची एनटीसी सह माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनात आश्वासन देवून, त्यांनी नेमलेल्या समिती कडून ही हालचाल झाली नाही. तर काही शासन धार्जीण संघटना च्या वतीने एमएमआरडी च्या घरांची मागणी करून गिरणीकामगारना मुंबई च्या बाहेर फेकण्याचा डाव केला आहे. या संघटनेचा याठिकाणी निषेध करण्यात आला यावेळी नारायण भंडागे यांनी मुंबई येथे कापड उद्योगातील एक चर्थुतअंश जागा गिरणीकामगारना देण्याचे मान्य केले आहे. यासाठी मुंबईत घरे देवून पुनर्वसन झाले पाहीजे याची आठवण करण्यासाठी ३० एप्रिल रोजी रास्ता रोको अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी काॅ. गोपाळ गावडे यांनी या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने गिरणीकामगार व वारसदार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले. यावेळी नारायण राणे, गणपती ढोणूक्ष , विजय पाटील, मनपा बोलके, धोडिबा कांबळे, जानबा धडाम, दौलती राणे, हिंदूराव कांबळे, काॅ. संजय घाटगे याच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते, आभार निवृत्ती मिसाळ यांनी मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.