Homeनाशिक - उ. महाराष्ट्रहनुमान जयंतीला चक्क वानरांची पंगत;⭕वानरांनीही एका रांगेत बसून केले भोजन……..

हनुमान जयंतीला चक्क वानरांची पंगत;⭕वानरांनीही एका रांगेत बसून केले भोजन……..

हनुमान जयंतीला चक्क वानरांची पंगत;
⭕वानरांनीही एका रांगेत बसून केले भोजन……..

अकोला – प्रतिनिधी मनोज कुमार

हनुमान जयंती हा उत्सव गुरुवारी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देशभरातील मंदिरांमध्ये पहाटेपासून भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम सुरु होते.
अनेक ठिकाणी भजन, कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील कोथळी खुर्द येथे अनोख्या पद्धतीने हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आल्याने याची राज्यभर चर्चा होत आहे.

आपण साधारण प्रत्येक उत्सवांमध्ये माणसांची पंगत पाहत असतो.
मात्र कोथळी खुर्द येथे हनुमान जयंती उत्सवानिमित्त चक्क वानरांची पंगत पार पडली आहे. गावातील मुंगसाजी माहाराज संस्थानच्या वतीने या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. वानरांनी रांगेत बसून शिस्तीने भोजनाचा आस्वाद घेतल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.
हनुमान हे एक वानर होते.
म्हणून त्यांच्या जयंती उत्वानिमित्त या वानर पंगतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थानने सांगितले.

रामायणातील कथेनुसार पवनपुत्र हनुमान हे श्रीरामाचे परम भक्त आणि सेवक होते.
रावनाने सीतामाताचे हरण केल्यानंतर लंकेत जाऊन सीतामातेचा शोध हनुमानाने लावला.
त्यानंतर राम जेंव्हा रावणासोबत युद्ध करण्यासाठी लंकेला जात होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत सैन्य म्हणून वानरसेना होती.
त्या युद्धात वानरांनी रामाला साथ दिली.
त्यामुळे देशभरात आजही सर्व प्राण्यांपेक्षा वानरांकडे हनुमानाचे सोबती आणि रामाचे भक्त म्हणून पाहिले जाते.
अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळी वानर आपल्याला दिसतात. लोकही भक्तीभावने त्यांना खायला देत असल्याचेही दिसते. अशाच प्रकारे अकोले जिल्ह्यातील या गावात हनुमान जयंतीनिमित्त वानर सेनेला भोजन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.