माहेर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आजरा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ संपन्न.
【 विकास कामासोबत आरोग्याचा विकास देखील अत्यंत महत्त्वाचा.- आम. आबिटकर.】
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील माहेर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आजरा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना आम. श्री आबिटकर म्हणाले विकास कामासोबत आरोग्याचा देखील विकास होणे महत्त्वाचा आहे. शासन आपल्या दारात आहे. त्याची सुरुवात माहेरा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आजरा तालुक्यात होत आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे काम आरोग्याचे आहे. यापुढे आरोग्याच्या दृष्टीने अधिक काम गतिमान करूया त्यासाठी आपले प्रयत्न आहेतच परंतु सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. यात मोठे समाधान आहे. लवकरच उपजिल्हा रुग्णालय साठी प्रयत्न चालू आहेत लवकरच तालुक्याला उपजिल्हा रुग्णालय होईल ज्या योजना या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीत त्या योजना मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे श्री आम.अबिटकर म्हणाले
यावेळी एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा. व या हॉस्पिटलमध्ये काही योजना वगळल्या आहेत. यामध्ये स्त्रीरोग आजार, प्रसुती विभाग, बालरोग विभाग तसेच पिशवीची ऑपरेशन्स स्त्रियांचे व कॅन्सर ऑपरेशन सुविधा मिळावी यासाठी सहकार्य व्हावे. व वगळलेल्या योजनेची मागणी आम. प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली श्री बर्नाड गाँडद यांनी प्रास्ताविकात केली. यावेळी ते म्हणाले आजपर्यंत माहेर हॉस्पिटलचा प्रवास यापुढील चा प्रवास यामध्ये नागरिकांच्या सहकार्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. व यापुढे आपल्याला चांगल्या सोयी मिळाव्यात हाच आमचा अट्टाहास असेल सद्या ज्या सुविधा मिळत आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री गाँडद यांनी केले. यावेळे बर्नडेट गाँडद यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या शुभारंभ कार्यक्रमाला तहसीलदार विकास अहिर नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्ष अस्मिता जाधव, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, जि.प माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी भाजप ता. अध्यक्ष सुधीर कुंभार तसेच कॉम्रेड संपत देसाई, डॉ. अनिल देशपांडे, मलिक बुरुड, नगरसेवक आनंदा कुंभार, नाथ देसाई, विजय थोरवत, अश्विन डोंगरे, संतोष भाटले, दत्ता पाटील, निलेश घाटगे, आजरा तालुका मेडिकल असोसिएशन आजराचे सर्व डॉक्टर्स, केमिस्ट असोसिएशनचे सर्व सभासद, माहेर हॉस्पिटल सर्व स्टाफ, आजरा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. रिया गाँडद यांनी आभार मानले.

[ माहेर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये मिळणाऱ्या सुविधा.- अति संवेदनशील प्रसूती, लॅप्रोस्कोपी, मूत्राशयाचे इंडॉस्कॉपी, कलर डॉप्लर सोनोग्राफी, प्रोस्टेट ग्रंथीचे ऑपरेशन, सीआर्म, डिजिटल एक्स-रे, व्हेंटिलेटर, धाप दम्याचे आजारावर उपचार, मुतखडा या वरील सगळे ऑपरेशन, थ्रीडी सोनोग्राफी, कॉल्पोस्कोपी, पिशवीच्या तोंडावरील कॅन्सरची तपासणी इत्यादी उपचार उपलब्ध असल्याची माहिती श्री गाँडद यांनी दिली. ]
