प्रा. सुनील शिंत्रेचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
( सर्वसामान्य जनतेच कृतिशील नेतृत्व म्हणजे प्रा. सुनील शिंत्रे. )
आजरा. – प्रतिनिधी.

केदारी रेडेकर शिक्षण संस्थेचे सचिव व आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा गडहिंग्लज व चंदगड परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील कृतिशील नेतृत्व असलेल्या प्रा. श्री.शिंत्रे यांनी बंद पडलेला आजरा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलून सर्वांच्या सहकार्याने आजरा साखर कारखाना चालू केला. व मागील गळीत हंगाम पूर्ण केला . सर्वसामान्य कुटुंबातील व प्रतिकुल परिस्थितीत उच्च शिक्षण घेत ते एम. आर. कनिष्ठ महाविद्यालय गडहिंग्लज या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सद्या ते शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून संघटनेच्या कामात वाहून घेतले आहे. कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय येथे गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालय यांच्या उभारणीत सक्रिय सहभाग आहे. सद्या आजरा साखर कारखान्याची पुढील वाटचाल यशस्वी करण्यासाठी ते सतत प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे विविध खात्याचे आजी माजी मंत्री आमदार, खासदार, तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध संस्था व प्रामुख्याने मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील या सर्वांच्या सहकार्याने आजरा कारखाना चालवण्यात यश आले आहे. प्रा. शिंत्रे यांनी विधानसभेची २०१२ साली शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी लढवली होती. आज दि. १४ रोजी त्यांचा वाढदिवस यानिमित्ताने आजरा – गडहिंग्लज – चंदगड विधानसभा मतदारसंघ संघात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.