Homeकोंकण - ठाणेआजरा हालेवाडीत लक्ष्मी मंदिरात देवीवरील चौदा तोळे दागिन्याची चोरी. - तालुक्यात खळबळ.

आजरा हालेवाडीत लक्ष्मी मंदिरात देवीवरील चौदा तोळे दागिन्याची चोरी. – तालुक्यात खळबळ.

आजरा हालेवाडीत लक्ष्मी मंदिरात देवीवरील चौदा तोळे दागिन्याची चोरी. – तालुक्यात खळबळ.

आजरा. – प्रतिनिधी.

हालेवाडी ता. आजरा येथील लक्ष्मी मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने मूर्तीच्या अंगावरील ५ लाख ७२ हजार रुपयांचे सुमारे १४ तोळे दागिने लपास केल्याची घटना घडली असून यामुळे हालेवाडी पंचक्रोशीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी शुक्रवार दि. १९ रोजी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत असणाऱ्या लक्ष्मी मंदिरात दरवाजाचे कुलुप काढून आत प्रवेश केल्यात्यानंतर त्यांनी देवीच्या मूर्तीवर घालण्याकरिता असणारे सुमारे १४ तोळे दागिने काढून घेऊन पोबारा केला शनिवारी सकाळी मंदिराची देखभाल करणारे सुनील शिवाजी पाटील हे मंदिराची स्वच्छता व मूर्तीची पूजा करण्यासाठी गेले असता सदर चोरी निदर्शनास आली सदर घटना घडली आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराजवळ मोठी गर्दी केली त्यानंतर आजरा पोलीस स्टेशनचे सपोनि सुनील हारगुडे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली यावेळी श्वान पतकालाही पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास आजरा पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.