देणारा हा नेहमीच सर्वश्रेष्ठ. किटवडे धनगरवाडा अंगणवाडीत . – विविध कार्यक्रमांसोबत “अंगत पंगत”
आजरा. – प्रतिनिधी.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षात देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शाळा/अंगणवाडीत विविध कार्यक्रम संपन्न झाले. किटवडे धनगरवाडा येथे विविध कार्यक्रम संपन्न आहे. विविध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आजरा तहसीलदार विकास अहिर यांचे शुभहस्ते तिरंगा ध्वज वाटप, घरोघरी तिरंगा फडकविणे, अंगतपंगत, विधवा महिलांना सन्मान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप , राष्ट्रगीत समुहगायन, वृक्षारोपण असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले
आजच्या ‘अंगतपंगत ‘कार्यक्रमासाठी किटवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते मनोहरदादा पाटील यांनी दात्याचे कामी करून खूप मोठी मदत केली आहे. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना लागणारे भोजन, पक्वान्ने यासाठी सढळ हस्ते मदत केली. मदत करणारा नेहमीच श्रेष्ठ असतो श्री. पाटील यांचे विद्या मंदिर किटवडे धनगरवाडा व अंगणवाडी शतशः आभारी राहील असे मत व्यक्त केले. याकामी अंगणवाडी सेविका सौ. देवयानी पाटील मॅडम व सौ. सुचिता गावडे यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.