प्रधानमंत्री किसान सन्मान योजना कामकाज त्वरित चालू करावे.- अन्यथा आंदोलन काॅ. शिवाजी गुरव.
आजरा. – प्रतिनिधी.
प्रधानमंत्री किसान योजनेतून वार्षिक सहा हजार रुपये मिळणारे शेतकऱ्यांचे पैसे काही खातेदारांना मिळत नाहीत. याबाबतचे निवेदन काॅ. शिवाजी गुरव यांनी आजरा तहसीलदार यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना नव्याने प्रस्ताव देण्याचे आहेत तर काही शेतकऱ्यांचे मध्येच पैसे बंद आहेत. काही प्रस्ताव थांबले आहेत. याबाबत चौकशीसाठी हेलपाटे मारून शेतकरी वैतागला आहे. तहसील कार्यालयाच्या नेमून दिलेल्या टेबलावर आमच्या संघटनेचा या कामावर बहिष्कार आहे. असे सांगितले जाते. तुम्ही कृषी कार्यालयाकडे जावे कृषी कार्यालयाकडे चौकशी केली असता सद्यातरी तहसील कार्यालयाकडे काम चालू नसल्याचे सांगितले जाते. हेलपाटे मारून शेतकरी मात्र बेजार होऊन गेला आहे. दोन्ही कार्यालयाचा समन्वय साधून ताबडतोब वेबसाईट चालू करून काम चालू करावे अन्यथा नाविलाजाने तहसील कार्यालयाच्या दारात कृषी विभागाला जबाबदार धरून दि. ५ ऑगस्ट २०२२ पासून धरणे आंदोलन करण्यात येईल या असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती- १) मा. जिल्हाधिकारी सो, कोल्हापूर .२) मा. कृषी अधिकारी आजरा. ३)मा. पोलीस निरीक्षक सो, आजरा यांना देण्यात आली आहेत.