पंतप्रधान किसान सन्मान योजनेची नवीन नोंदणी व दुरुस्तीबाबत. – आजरा शिवसेनेचे निवेदन.
आजरा. – प्रतिनिधी.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेची नवीन नोंदणी व दुरुस्तीबाबत आजरा तहसीलदार कार्यालयात काम बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. याबाबत आजरा शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली आजरा तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की गेली दोन वर्ष पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी यांना नोंदणी व दुरुस्तीबाबत हेलपाटे मारावे लागत आहेत. आपले कार्यालयातील सदर टेबलवर चालणारे काम बंद असल्यामुळे नव्याने जमीन खरेदी केलेले व काही जुन्या नोंदी असलेल्या दुरुस्ती करणे बाबतचे काम थांबलेले आहे. यामुळे या योजनेपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी खातेदार यांना आपल्या कार्यालयात हेलपाटे मारत असल्यामुळे त्यांचे हाल होत आहे. तरी येणाऱ्या आठ दिवसात या योजनेची नोंदणी चालू नाही झाल्यास आपल्या कार्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाने दिला आहे. या निवेदनावर जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील तालुकाप्रमुख युवराज पोवार शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, तसेच अनपाल तकीलदार, महेश पाटील, रवी यादव, लहू रेडेकर, मारुती कदम, वसंत पोतणीस, अशोक लोहार, राजू गुरव, महादेव चव्हाण, हनुमंत शेळके सह शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.