गोव्यातून ये- जा करणाऱ्यांसाठी कोरोना टेस्ट अनिवार्यदोन दिवसानंतर होणार अमलबजावणीस सुरुवात दोडामार्ग तहसिलदार खानोलकर यांची माहिती
दोडामार्ग – प्रतिनिधी.
दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात कामानिमित्त दररोज ये जा करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता गोव्यात ये जा करण्याऱ्या नागरिकांना दोन दिवस मुभा मिळणार आहे.दोन दिवसानंतर जर कामानिमित्त गोव्यातुन ये जा करायचे असल्यास आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली. मात्र एकदा टेस्ट केल्यावर पुढील दहा दिवस मुभा मिळणार आहे. अशी माहिती दोडामार्ग तहसीलदार श्री. खानोलकर यांनी दिली.