Homeकोंकण - ठाणेमहाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश ; पाच नक्षलवाद्यांचा खात्मा..

महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश ; पाच नक्षलवाद्यांचा खात्मा..

महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश ;
पाच नक्षलवाद्यांचा खात्मा.

कुरखेडा. प्रतिनिधी.

कुरखेडा उपविभागांतर्गत मालेवाडा पोलीस मदत केंद्र हद्दीतील खोंब्रामेंढा व हेटाळकसाच्या जंगलात नक्षल विरोधी अभियान राबवणारे सी-६० पथक व नक्षलवाद्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या नक्षलवादविरोधी अभियानात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे.
सकाळी साडेसात ते आठ दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये पाच नक्षलवादी ठार झाले आहेत.
यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
पोलीस दलाला मिळालेल्या या यशामुळे सुरक्षा दलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
गडचिरोली:कुरखेडा पोलिस उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नॅक्सलवाद विरोधी अभियानाला सकाळी ७.३० ते ८ या वेळेत झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले.
यात ३ पुरुष व २ महिला आहे.
दरम्यान पोलिस दलाला मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढला आहे.
खोंब्रामेंढा- हेटाळकसाच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू असून ६० ते ७०च्या संख्येत मोठ्या प्रमाणात नक्षली सहभागी झाली असल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली.
या माहितीवरून पोलीस अधीक्षक गोयल यांच्या मार्गदर्शनात अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात जंगल परिसरात सी-६० पथकाने शनिवारी सकाळी सात वाजता नक्षल विरोधी अभियानाला सुरुवात केली.
त्याचवेळी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.
प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.