Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रइंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर.
मुंबई. प्रतिनिधी.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेसाठी पहिल्यांदाच संघात सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शानदार खेळी करणाऱ्या मोहम्मद सिराजला देखील संधी मिळाली आहे.

पाच वेगवान गोलंदाजांना संधी

इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला आहे. संघात पाच वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे. भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.

एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक

पहिली वनडे- 23 मार्च (पुणे)

दुसरी वनडे- 26 मार्च (पुणे)

तिसरी वनडे- 28 मार्च (पुणे)

असा असेल भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, केएल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.