Homeकोंकण - ठाणेDHFL घोटाळा:- सुशीलकुमार शिंदेंच्या मुलीची आणि जावयाची कमर्शियल संपत्ती ED'कडून जप्त

DHFL घोटाळा:- सुशीलकुमार शिंदेंच्या मुलीची आणि जावयाची कमर्शियल संपत्ती ED’कडून जप्त

DHFL घोटाळा:-
सुशीलकुमार शिंदेंच्या मुलीची आणि जावयाची कमर्शियल संपत्ती ED’कडून जप्त

मुंबई. प्रतिनिधी १५ :-

दिवाळखोरीत निघालेल्या दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवानसंबंधीत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ED ने जप्त केली आहे. जप्त केलेली संपत्ती अंधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथे आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकने दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडला दिलेल्या 3,688.58 कोटी रुपयांचं कर्ज फ्रॉड घोषित केलं. या कंपनीची YES बँकमध्येही लोन घोटाळ्याबाबत चौकशी सुरू आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधु अटकेत असून ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली आहे. येस बँक लोन घोटाळ्याप्रकरणी ईडीने बँकेचे माजी प्रमुख राणा कपूर आणि DHFL चे प्रमोटर्स कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची 2400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी अटॅच आहे. यात राणा कपूर यांची 1000 कोटी आणि वाधवान बंधुंची 1400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी सामिल आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये दिवाळखोरी प्रक्रिया मंजूर झाली:-

नोव्हेंबर 2020 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी डीएचएफएलला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) कडे सोपविले. DHFL पहिली आर्थिक कंपनी आहे, ज्याला RBI ने कलम 227 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत NCLT मध्ये पाठवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.